सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, 'त्यांनी ५० खोके घेतले, त्यामुळे काम करायची गरज वाटत नाही' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 18, 2022

सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, 'त्यांनी ५० खोके घेतले, त्यामुळे काम करायची गरज वाटत नाही'

https://ift.tt/bWAqvu7
बारामती, पुणे : पितृपंधरवाड्यामुळे अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'याचे मला फारसे ज्ञान नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे सरकार येऊन अडीच महिने झाले आहेत. ज्यांना कामच करायचे नाही, रुसवे फुगवे आहेत. त्यांनी ५० खोके घेतले आहेत. त्यामुळे काम करायची गरज वाटत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैवं आहे', असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. बारामती किंवा पुणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने एक षडयंत्र होत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी बारामतीत केला. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आपली खुर्ची वाचविण्यासाठी राज्य पणाला लावत आहे, अशी टीका सुळे यांनी केली आहे. सरकार येऊन अडीच महिने झाले तरी अनेक मंत्री अजून त्यांच्या कार्यालयातही गेले नाहीत. पालकमंत्र्यांची नेमणूक केली नाही. डीपी डीसीचे हक्काचे पैसेही खर्च होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील विकास कामे ठप्प आहेत. महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे नेऊ, असे उदगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना काढले. यावर अधिक भाष्य न करता आम्ही त्याची वाट बघतोय, असं सुळे म्हणाल्या. पहिली ते चौथीपर्यंतच्या गृहपाटबाबत सरकार काही बदल करू इच्छित आहे. यावर सुळेंनी प्रतिक्रिया दिली. कोविड काळात मुलांच्या शिक्षणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अजून काही बदल करू नयेत. बदल करायचेच असतील तर तज्ज्ञांना विचारून करावेत. याबाबत मी सरकारशी बोलणार असून नेमकं सरकारच्या मनात काय आहे हे जाणून घेणार असल्याचं त्या म्हणाल्या. काही गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या असतात. कोणाचेही सरकार असले तरी शेतकरी आत्महत्यांबाबत गांभीर्याने सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे. केंद्र सरकार सातत्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले आहे, असे सांगते. मात्र केंद्र व राज्य सरकारने शेतकरी आत्महत्यांबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. बारामतीत बिबट्या सफारी प्रकल्प उभारण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना घेतला होता. पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडिखेल याठिकाणी १०० हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती. तसंच जवळपास ६० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र याविरोधात जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. पण बारामतीमध्ये आणि जुन्नर या दोन्ही ठिकाणी हा प्रकल्प करण्यात येईल, असं पवारांकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र सत्ता पालट होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता या प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द केला असून हा प्रकल्प जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण या ठिकाणीच होणार असल्याचे सांगितलं आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. या प्रकल्पाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.