
नागपूर : जसप्रीत बुमराने या सामन्यात दणक्यात पुनरागमन केले. बुमराने आपल्या पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला बाद केले. पण त्यानंतर फिंचने नेमंकं काय केलं, याची चर्चा क्रिकेट विश्वात रंगली आहे. ऑस्ट्रेलियाचे विकेट्स एकामागून एक पडत असताना फिंच मैदानात उभा होता आणि दमदार फटकेबाजी करत होता. पण बुमराने त्याला आपल्या पहिल्या षटकात क्लीन बोल्ड केले. पण बोल्ड झाल्यानंतर फिंचने नेमकं काय केलं, याची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे. बुमराने यावेळी आपले मुख्य अस्त्र असलेला यॉर्कर बाहेर काढला आणि त्यावर त्याने फिंचला बाद केले. फिंचला आपण बोल्ड झाल्याचे समजले आणि तो पुढे सरसारवला. यावेळी फिंचने आपली बॅट हातात घेतली आणि त्याने बॅटने बुमराला सलाम केला. कारण बुमराचा हा चेंडू खेळण्यासाठी शक्यच नव्हता. पण प्रतिस्पर्धी असूनही यावेळी फिंचने बुमराचे कौतुक केल्याचे पाहायाल मिळाले. या सामन्याचा टॉस ६.३० वाजता होणार होता. पण त्यावेळी पावसामुळे मैदान निसरडे होते आणि पंचांनी थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पंचांनी रात्री ८.०० वाजता मैदानाची पाहणी करता येईल, असे सांगितले होते. दोन्ही पंच मैदानाची पाहणी करण्यासाठी ८.०० वाजता आले,पण तेव्हाही मैदान निसरडे होते. त्यामुळे पंचांनी पुन्हा रात्री ८.४५ वाजता पाहणी करण्याचा निर्णय घेतला. विश्वचषकासाठी होऊ शकतात प्रयोग...भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका ही विश्वचषकासाठी महत्वाची ठरू शकते. कारण विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. त्यामुळे या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर भारताचा चांगला सराव होऊ शकतो. त्याचबरोबर विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला अजून काही प्रयोग करायचे असतील तर त्यांना या मालिकेत करता येऊ शकतात. भारतीय संघ:रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह. ऑस्ट्रेलिया संघ :ॲरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, ॲश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, नॅथन एलिस.