पावसाच्या सावटात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी टी-२०; जाणून घ्या कसे असेल नागपुरचे हवामान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 23, 2022

पावसाच्या सावटात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी टी-२०; जाणून घ्या कसे असेल नागपुरचे हवामान

https://ift.tt/lpk5Hhe
नागपूर: मोहालीतील लढतीत मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि 'डेथ ओव्हर्स'मधील निष्प्रभ माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात मंगळवारी भारताचा पराभव झाला. संयुक्त अरब अमिरातीमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या आशिया कप स्पर्धेतही शेवटच्या षटकांतील गोलंदाजीच भारताच्या अपयशासाठी कारणीभूत ठरली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ दुसऱ्या टी-२० सामन्यात आज, शुक्रवारी ऑस्ट्रेलियाशी () भिडणार आहे. नागपुरात होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. नव्या योजनांसह भारत विजय मिळवेल, अशी आशा आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपूर्वीची रंगीत तालीम म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेकडे पाहिले जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या दोघांच्याही भवितव्याच्या दृष्टीने वर्ल्ड कपमधील संघाची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, प्रथम आशिया कप स्पर्धा आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधार म्हणून रोहितच्या काही निर्णयांबाबत चर्चा सुरू झाली आहे. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारून दिल्यानंतरही मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांना स्वत:ची भूमिका योग्य रितीने बजावता आलेली नाही. त्यामुळेच विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी द्रविड आणि रोहित या दोघांनाही समीकरणांची फेरमांडणी करावी लागणार आहे. वाचा- कर्णधार रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक/ऋषभ पंत अशी दमदार फळी असल्यामुळे भारताला फलंदाजीत फारशी चिंता करण्याचे कारण नाही. मात्र, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन विभागांकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आशिया कप स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगने सोडलेला झेल भारताला महाग पडला होता. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातही भारतीय खेळाडूंनी तीन झेल सोडले होते. वाचा- दृष्टिक्षेप... - विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. या मैदानावर नोव्हेंबर २०१९मध्ये झालेल्या लढतीत भारताने बांगलादेशचा २९ धावांनी पराभव केला होता. - पावसाने उसंत दिली तर नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. जामठा स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या १२ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांपैकी नऊमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. - व्हीसीएचे हे मैदान जलदगती गोलंदाज दीपक चहरसाठी चांगलेच लाभदायी राहिले आहे. या मैदानावर २०१९मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात दीपकने ३.२ षटकांत ७ धावा देत ६ गडी बाद केले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीमध्ये दीपकची कामगिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे. - टी-२० सामन्यात प्रेक्षकांना धावांचा पाऊस पडण्याची अपेक्षा असते. मात्र, जामठा स्टेडियमवर आतापर्यंत केवळ एकदाच २०० धावांचा पल्ला गाठता आला आहे. उर्वरित सर्व लढती या कमी धावसंख्येच्या ठरल्या आहेत. वाचा- ... भुवीचे करायचे काय? सध्याच्या भारतीय संघात भुवनेश्वरकुमार हा सर्वांत अनुभवी गोलंदाज आहे. अचूक मारा करत प्रतिस्पर्धी संघावर नियंत्रण ठेवणे हे भुवनेश्वरचे वैशिष्ट्य. मात्र, मागील काही सामन्यांत; विशेषत: शेवटच्या षटकांत त्याच्याकडून स्वैर मारा झाला. त्याचा फटका अर्थातच भारतीय संघाला बसला. भुवनेश्वर 'डेथ ओव्हर्स'मध्ये अपयशी ठरतो आहे, हे लक्षात आल्यानंतरही रोहितने पहिल्या सामन्यात त्यालाच १९वे षटक दिले आणि सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. मागील तीन सामन्यांत पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भुवनेश्वरने १९व्या षटकात ४९ धावा दिल्या आहेत. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांमध्ये भुवनेश्वरला खेळवायचे असेल तर त्याचा योग्य ठिकाणी वापर व्हायला हवा. यातून संघ निवडणार भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दीक पंड्या, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव. ऑस्ट्रेलिया : अॅरन फिंच (कर्णधार), शॉन अबॉट, ॲश्टन ॲगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅशन इलिस, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झंपा. पावसाचे अनुमान, तयारी मात्र पूर्ण नागपुरात तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत असल्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र, शुक्रवारी नागपूरसह विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गुरुवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दोन्ही संघांनी सराव केला नाही. पावसामुळे मैदान खराब होऊ नये यासाठी मैदानभर कव्हर टाकण्यात आले आहे. पावसाने उसंत घेतली तर विनाअडथळा सामना खेळवला जावा, याची संपूर्ण तयारी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने केली आहे. दरम्यान, शुक्रवारी पावसाचा अंदाज असला तरी सायंकाळी तशी शक्यता फार कमी आहे. पाऊस आला तरी तो थोड्या वेळासाठी असेल, असे हवामान खात्यातील सूत्रांनी सांगितले.