मुंबई : आतापर्यंत जे आयपीएलला जमलं नाही किंवा यापुढेही जमणार नाही, ती गोष्ट आता प्रो कबड्डीमध्ये पाहायला मिळणार आहे. यावर्षी प्रो कबड्डीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी प्रो कबड्डीचा वेगळाच थरार आता चाहत्यांना अनुभवता येणार आहे. प्रो कबड्डी लीगच्या नवव्या मोसमाच्या पहिल्या सत्राचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. बंगळुरू येथील कांतिरवा इंडोर स्टेडियममध्ये ७ ऑक्टोबरपासून पहिल्या सत्रास सुरुवात होईलतर पुण्यातील बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुलात (बॅडमिंटन हॉल) २८ ऑक्टोबरपासून स्पर्धेचा उत्तरार्ध पार पडणार आहे. या मोसमापासून प्रेक्षकांचे स्टेडियममध्ये पुनरागमन होईल. साखळीत आता दर शुक्रवार, शनिवारी तीन सामने रंगणार आहेत. उदघाटनाच्या दिवशी ७ ऑक्टोबरला गतविजेता दबंग दिल्ली विरुद्ध यू मुंबा ही लढत असून त्याच दिवशी बंगळुरू बुल्स विरुद्ध तेलगू टायटन्स ही दुसरी तर यूपी योद्धा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स ही तिसरी झुंज असेल. लीगच्या दुसऱ्या सत्राचा कार्यक्रम ऑक्टोबर अखेर जाहीर करण्यात येणार असून त्यामुळे पहिल्या सत्रातील कामगिरीच्या आधारावर सर्व संघांना डावपेचात बदल करता येणार आहे. आतापर्यंत आय़पीएलचे दोन सामेन आपण सर्वांनी पाहिले आहेत. पण त्यापुढे प्रो कबड्डीने आता एक पाऊल टाकले आहे. प्रो कबड्डीमध्ये आता एकाच दिवशी तीन सामने पाहायला मिळणार आहे. आयपीएलमध्ये ही गोष्ट आतापर्यंत घडलेली नाही किंवा यापुढे घडेल, असेही वाटत नाही. पण प्रो कबड्डीने मात्र हे धाडसाचे पाऊल यावेळी उचलले आहे. त्यामुळे या प्रो कबड्डीच्या हंगामात शुक्रवार आणि शनिवार या दिवसांमध्ये तुम्हाला तीन सामन्यांची लज्जत लुटता येऊ शकते. पण रविवारीही तीन सामने खेळवण्यात येणार का, याचा विचारही सुरु असल्याचे समजते आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जाईल की नाही, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या प्रो कबड्डीमध्ये शुक्रवार आणि शनिवारी नक्कीच तीन सामन्यांची पर्वणी चाहत्यांसाठी असेल.
https://ift.tt/nrMwiAE