
मुंबई: राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. आजपासून पावसाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येते ४ ते ५ दिवस राज्यात पावसाचा जोर कायम असणा आहे. तर, तिकडे रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने पुण्याला अक्षरश: झोडपून काढलं. जवळपास तीन तास झालेल्या तुफान पावसाने पुणेकरांची दाणादाण उडाली. मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरीत जोरदार पाऊस मुंबईसह रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. येत्या ४-५ दिवस राज्यात कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहान हवामान विभागाने केलं आहे. राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, रविवारपासूनच राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पुण्यात तुफान पाऊस रविवारी सायंकाळी पुण्यात विजांच्या कडकाडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. पुण्याच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातही मुसळधार पाऊस कोसळल्याने पाण्याचे लोंढे वाहू लागले. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. दुपारी उन्ह आणि सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. हेही वाचा -