ऑस्ट्रेलियात दिसला दिनेश कार्तिकच्या वडिलांचा साधेपणा, सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणेच... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 26, 2022

ऑस्ट्रेलियात दिसला दिनेश कार्तिकच्या वडिलांचा साधेपणा, सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणेच...

https://ift.tt/wiQzok3
सिडनी: एक व्यक्ती सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय क्रिकेट सांघाच्या सराव सत्राची वाट पाहत एका कोपर्यात उभे होते. त्या व्यक्तीचे नाव कृष्ण कुमार. कृष्ण कुमार हे दुरून भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार प्रसून बॅनर्जीसारखे दिसत होते. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून दिनेश कार्तिकचे वडील होते, जे आपल्या मुलाला टी-२० विश्वचषकात भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका बजावताना पाहण्यासाठी आले होते. कृष्ण कुमार कोणत्याही विशिष्ट फलंदाजाकडे पाहत नव्हते. त्यांनी आपल्या मोबाईलचा कॅमेरा सुरू केल्यानंतर तो वापरता येणार नाही असे, त्यांना सांगण्यात आले आणि असे करणे नियमांचे उल्लंघन केल्यासारखे आहे. पण नंतर ते दिनेश कार्तिकचे वडील असल्याचे समजल्यानंतर पत्रकारही त्यांच्यापर्यंत पोहोचले. कार्तिक हा भारतीय संघातील सर्वात जुना आणि सिनियर खेळाडू आहे. त्याने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि कदाचित तो त्याची शेवटची आयसीसी स्पर्धा खेळत असल्याचे म्हटले जात आहे. वाचा: आपल्या मुलाच्या पुनरागमनाबद्दल त्यांनी अनेक यूट्यूब चॅनेल्सशीही चर्चा केली. कार्तिक असा क्रिकेटपटू आहे, जो जेव्हाही भारताकडून खेळतो तेव्हा त्याचे आई-वडील त्याचा खेळ पाहायला येतात. कार्तिक जेव्हा राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेट खेळत होता, तेव्हा त्याची आई पद्मिनी अनेकदा त्याचे सामने पाहायला येत असे. त्याचे वडील मात्र प्रवासात असल्याने रविवारी मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धचा सामना पाहू शकले नाहीत. हेही वाचा: कार्तिकला टीम इंडियामध्ये फिनिशरची भूमिका दिनेश कार्तिक टी-२० क्रिकेट संघात टीम इंडियासाठी फिनिशरच्या भूमिकेत आहे. तो अनेकदा संघासाठी सामना संपवताना दिसला आहे. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाने कार्तिकवर विश्वास दाखवला आणि त्याची टी-२० विश्वचषकासाठी निवड केली. याशिवाय, तो ऋषभ पंतचा पर्याय आहे, जो त्याच्या अनुपस्थितीत संघासाठी विकेटकीपिंग देखील करतो. वाचा: कार्तिकने टीम इंडियासाठी २६ कसोटी सामने, ९४ एकदिवसीय सामने आणि ५७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कार्तिकने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी १०२५ धावा केल्या आहेत. त्याचवेळी, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७५२ धावा केल्या आहेत, तर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये त्याच्या नावावर ६७३ धावा आहेत.