एक वर्षाच्या चिमुरडीला श्वास घेताना त्रास; रिपोर्ट पाहून कुटुंबाला जबर धक्का, डॉक्टर चकित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 2, 2022

एक वर्षाच्या चिमुरडीला श्वास घेताना त्रास; रिपोर्ट पाहून कुटुंबाला जबर धक्का, डॉक्टर चकित

https://ift.tt/f3R1yVp
भोपाळ: मध्य प्रदेशातील भोपाळच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी एका वर्षाच्या मुलीच्या श्वसन नलिकेतून केसांचा पिन काढला आहे. डॉक्टरांच्या टिमनं करून पिन बाहेर काढली. गेल्या ३ दिवसांपासून मुलगी श्वास घेताना वेगळ्या प्रकारचा आवाज येत होता. त्यामुळे तिचे कुटुंबीय तिला घेऊन इंदूरमधील एका रुग्णालयात पोहोचले. तिथल्या डॉक्टरांना त्यांना एम्समध्ये रेफर केलं. भोपाळच्या एम्समधील आपात्कालीन विभागात मुलीला जदाखल करण्यात आलं. सहा ENT डॉक्टरांचं पथक तयार करण्यात आलं. मुलीच्या छातीची रेडिओग्राफी करण्यात आली. हाय रिसॉल्युशन सीटी (कम्युटेड टोमोग्राफी) करण्यात आली. मुलीच्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसातील खालच्या भागात केसाचा एक मोठा पिन अडकल्याचं त्यातून स्पष्ट झालं. अशा प्रकारच्या केसमध्ये रुग्णांची रिजिड ब्रॉन्कोस्कॉपी केली जाते. या प्रक्रियेच्या माध्यमातून डॉक्टर रुग्णाच्या श्वसन नलिकेत अडकलेली वस्तू काढू शकतात किंवा तिची तपासणी करू शकतात. रिजिड ब्रॉन्कोस्कॉपी करून डॉक्टरांनी ऑप्टिकल चिमट्याच्या मदतीनं मुलीच्या फुफ्फुसात अडकलेली केसांची पिन काढली. शस्त्रक्रिया करणाऱ्या टीममध्ये डॉ. विकास गुप्ता, डॉ. उत्कल मिश्रा, डॉ. गणकल्याण बेहरा, डॉ. राहुल वर्मा, डॉ. अंगम आणि डॉ. रश्मी यांचा समावेश होता. याशिवाय ५ जणांची ऍनेस्थेशिया टीमदेखील सोबत होती. पोटातून काढले स्टिलचे ६३ चमचे काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूरमध्ये एका ३२ वर्षीय व्यक्तीच्या पोटातून स्टिलचे ६३ चमचे काढण्यात आले. जवळपास दोन तास शस्त्रक्रिया चालली. तू चमचे गिळले होतेस का, अशी विचारणा डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीकडे केली. त्यावर त्यानं नकारार्थी उत्तर दिलं. हा व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून नशा मुक्ती केंद्रात होता. गेल्या ५ महिन्यांत त्यानं स्टिलचे ६३ चमचे गिळले.