
: उस्मानाबाद जिल्हयातील पद्मसिंह पाटील यांचे कुटुंबीय म्हणजे शरद पवार यांच्या खांदयाला खांदा लावून असणारे, तसेच चांगल्या-वाईट काळात कायम सोबत असणारे म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिले जात होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. याचे शल्य पवार कुटुंबीयांना होते. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते हे यावर जाहिररित्या कधीही बोलले नव्हते. परंतु आज त्यानी राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर भरसभेत टीका करुन मनातील शल्य बोलून दाखवले आहे. () 'राणा पाटलाला कुठली अवदसा सुचली अन राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. त्याला काय कमी केलं होतं', या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर टीका केली आहे . क्लिक करा आणि वाचा- विरोधी पक्षनेते अजित पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान अजित पवार हे पाटील कुटुंबावर काय बोलणार, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर संयम सोडत अजित पवार यांनी उमरगा शहरातील भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या कार्यक्रमादरम्यान पाटील कुटुंबावर टीका केली. राणा पाटलाच्या डोक्यात कुठली अवदासा शिरली अन राष्ट्रवादी काँग्रेस सोडली त्याला काय कमी केलं होतं अशा शब्दात अजित पवार यांनी पाटील कुटुंबावर टीका केली क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-