दारुच्या नशेत विराटची खिल्ली; संतापलेल्या चाहत्याने रोहित शर्माच्या फॅनला संपवलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 15, 2022

दारुच्या नशेत विराटची खिल्ली; संतापलेल्या चाहत्याने रोहित शर्माच्या फॅनला संपवलं

https://ift.tt/XLKI7GO
अरियालूर : भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. तर काही चाहते क्रिकेटरची देवासारखी पूजा करतात आणि त्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूबद्दल काहीही वाईट ऐकायला आवडत नाही. याचदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे विराट कोहलीच्या चाहत्याने रोहित शर्माच्या समर्थकाची हत्या केली. एका २१ वर्षीय तरुणाला तामिळनाडूमध्ये दारुच्या नशेत असताना त्याच्या मित्राची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नंतर या व्यक्तीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हे प्रकरण तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील आहे. किलापालूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माचा चाहता विघ्नेश आणि विराट कोहलीचा चाहता धर्मराज हे मल्लूरजवळील सिडको औद्योगिक वसाहतीजवळील एका मोकळ्या जागेत क्रिकेटवर चर्चा करत होते. दोघांनी मद्य प्राशन केले होते. प्राथमिक तपासानुसार, विघ्नेश इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत होता, तर धर्मराज हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (आरसीबी) समर्थक होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वादादरम्यान विघ्नेशने आरसीबी आणि विराट कोहलीची खिल्ली उडवली होती. धर्मराजाला अडकून बोलण्याची सवय होती. त्यादिवशी त्याने आरसीबी संघाची तुलना धर्मराजला बोलण्याशी केली. यामुळे संतप्त झालेल्या धर्मराजने विघ्नेशवर बॉटलने हल्ला केला आणि नंतर क्रिकेटच्या बॅटने त्याच्या डोक्यात वार केले. त्यानंतर धर्मराज लवकरच घटनास्थळावरुन पळून गेला. २४ वर्षीय पी विघ्नेश असे मृताचे नाव आहे. तो मूळचा अरियालूर जिल्ह्यातील पोयुर गावाचा आहे. पोलिसांनी सांगितले की, आयटीआय पूर्ण केलेला विघ्नेश सिंगापूरला जाण्यासाठी जॉब व्हिसाची वाट पाहत होता. पोलिसांनी विघ्नेशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी अरियालूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.