पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या,अंधेरी पोटनिवडणूक ते शेतीचं नुकसान, शिंदे फडणवीसांमध्ये उच्चस्तरीय बैठक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 16, 2022

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या,अंधेरी पोटनिवडणूक ते शेतीचं नुकसान, शिंदे फडणवीसांमध्ये उच्चस्तरीय बैठक

https://ift.tt/F2JfB9W
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक दोन ते अडीच तासांहून अधिक वेळ सुरु होती, अशी माहिती समोर आली आहे. राज्यातील आगामी सण, उत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चर्चा करण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होत असल्याची माहिती आहे. तर, महाविकास आघाडीच्या काळात नियुक्ती केलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील केल्या जाणार असल्याचं कळतंय. हा निर्णय दिवाळीपूर्वीच होण्याची शक्यता आहेत. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालंय त्याबाबत देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार? महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महत्त्वाची खबरदारी घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता असल्याचं कळतंय. शेतीच्या नुकसानावर चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीस राज्यातील पावसानं निर्माण झालेली स्थिती यावर चर्चा केली. ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी पावसाचं प्रमाण कमी झालेलं नाही. खरीप हंगामातील पिक काढणीला आली असताना पावसानं मोठं नुकसान केलं आहे. त्याबाबत, ओला दुष्काळ, अतिवृष्टीची मदत आणि सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या बाबत देखील दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. अंधेरी बाबत चर्चा अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत कायदा आणि सुरेशचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची खबरदारी कशाप्रकारे घ्यावी याविषयी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. महाविकास आघाडी सरकारने जे वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमले होते त्यांच्या आता बदल्या शिंदे आणि ठाकरे सरकार करणार आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.