राज ठाकरे, राणे, आमदार खासदार सोडून गेले तरी मीपणा कायम, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 6, 2022

राज ठाकरे, राणे, आमदार खासदार सोडून गेले तरी मीपणा कायम, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

https://ift.tt/GryUfVn
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं हिंदुत्व, सेनेतून बाहेर पडलेले लोक, आमदार खासदारांनी तुम्हाला तुमच्या मी पणामुळं सोडल्याटी टीका केली. एकनाथ शिंदेंनी भाषणाला सुरुवात करताच शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांचे पाईक असलेल्या शिवसैनिकांना माझा नमस्कार, असं म्हटलं. या विराट जनसमुदायला मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या समोर मी नतमस्तक होतो. या जनसमुदायाने सिद्ध केलंय की शिवसेना कुणाची, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही जे केलं ते राज्याच्या हितासाठी आम्ही जे केलं ते राज्याच्या हितासाठी केलं आहे. ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची. ही शिवसेना शिवसैनिकांची. ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेब रिमोट कंट्रोल ने सरकार चालवत होते. पण तुम्हीतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या रिमोटने सरकार चालवत होतात. सत्तेसाठी तुम्ही वडिलांचे विचार विकले. होय गद्दारी झालेली आहे. पण गद्दारी ही २०१९ ला झाली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी झाली. जनतेशी गद्दारी झाली, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तुमची गद्दारी जनतेला कळाली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना खरे गद्दार कोण? कोणी केली गद्दारी ?आम्ही गद्दार नाही, तुम्ही गद्दार आहात. खऱ्या अर्थाने तुम्ही साहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. तुमची गद्दारी जनतेला कळली, म्हणून तर एवढा जनसमुदाय इथे लोटला आहे. आता जनतेने ठरवलं आहे. गद्दारांना साथ द्यायची नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्ही बापाचे विचार विकले मीच ग्रामीण भागातील आमदारांना भेटायचो, बाकी कुणीही नाही, पराभूत उमेदवारांना राष्ट्रवादी-काँग्रेस ताकत द्यायचे,मी हे ठाकरेंना सांगितलं आम्ही केलेली गद्दारी केली नाही. हा गदर आहे. बाळासाहेबांच्या विचारांची क्रांती आहे. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही बापाचे विचार विकले, बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला मिळालं आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आरएसएसवर बंदीची मागणी हास्यास्पद, आरएसएसचं राष्ट्रउभारणीत महत्वाचं योगदान. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी PFI वर घेतलेले निर्णय योग्य आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केलं आहे. जरा विचार करा, तुमचे बंधू राज ठाकरे तुमच्या सोबत राहिले नाहीत. नारायण राणे सोडून गेले. स्मिता ठाकरे वाहिनी, निहार ठाकरे इथेच बसलेत. का बसलेत? आता तरी याचा विचार करा, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्हांला मुख्यमंत्री म्हणून ५ वर्ष पूर्ण करायची होती. शिवसेनेचे होत असलेले पानिपत तुम्ही पाहत बसला होतात. बाळासाहेब आणि पवारांची दोस्ती होती. पण राजकारणात बाळासाहेबांनी कधी दोस्ती मध्ये आणली नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकीकडे शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होतं आणि आमचे पक्षप्रमुख धृतराष्ट्राची भूमिका निभावत होते. 2.5 वर्ष का गप्पं बसलो? आमच्या देवाचं अंश तुम्ही म्हणून शांत बसलो. आम्हाला रिक्षावाला, पानवाला म्हणणारे आता कुठे आहेत? चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला. तुम्ही त्यांची खिल्ली उडवली. हे शिवसैनिक आहेत म्हणूम मी शिवसेनाप्रमु्ख आहे असं बाळसाहेब म्हणायचे. आता तुमच्याकडचे लाखो शिवसैनिक गेले. आमदार गेले, खासदार गेले. तरी मी पणा कायम आहे. अजूनही तुमचे डोळे उघडत नाहीत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी वर्क फॉर्म होम केलं, आम्ही वर्क विदाऊट होम केलं, सातच्या आत घरी जाण्याची शिवसैनिकांची संस्कृती नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. कोविड-कोविड करुन तुम्ही सर्वांना घरात बसवलं, तुम्ही मंदिरं बंद केली, दुकानं बंद केली, असंही शिंदे म्हणाले.