ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची; मग शिवसेना कोणाची? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 6, 2022

ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची; मग शिवसेना कोणाची? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

https://ift.tt/qyFXhOb
मुंबई: शिवसेनेत () यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर पक्ष कोणाचा यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात लढाई सुरू झाली. खरी शिवसेना कोणाची यासाठी दोन्ही गटाने निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात कायदेशील लढाई सुरू केली. या संघर्षाच्या वेळी दोन्ही गटाचे वेगवेगळे दसरा मेळावे झाले. शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. तर मुख्यमंत्री यांनी भाषणाच्या सुरुवातीला खरी शिवसेना कोणाची याचे उत्तर दिले. बाळासाहेब यांच्या विचारांचे वारसदार कोण आहे या प्रश्नाचे उत्तर या गर्दीने दिले आहे. तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवले. पण मी मुख्यमंत्री असून देखील त्यात हस्तक्षेप केला नाही. बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती दिलात, आता त्या जागेवर उभा राहण्याचा आणि बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहे का असा सवाल शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. वाचा- .. बाळासाहेब रिमोटने सरकार चालवायचे आणि तुम्ही... बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा उल्लेख हरामखोर असा केला तुम्ही त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली. बाळासाहेब रिमोटने सरकार चालवायचे, तुम्ही तर शिवसेना पक्षाचा रिमोट काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे दिला. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी आणि हिंदुत्वासाठी भूमीका घेतली. आम्ही भूमीका जाहीरपणे घेतली लपून छपून घेतली नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मी ३ महिने राज्यभर फिरतोय लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. वाचा- .. राज्यातील लोकांचा जो पाठिंबा मिळत आहे त्यावरून मी हे सांगतो की, ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ही शिवसेना ना एकनाथ शिंदेंची ही फक्त आणी फक्त बाळासाहेंबांच्या विचारांची शिवसेना आणि तुम्हा तमाम शिवसेनिकांची शिवसेना आहे. एकनाथ शिंदेंच्या या वाक्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.