जडेजा, बुमरानंतर भारतीय संघाला बसला आहे अजून एक धक्का, मॅचविनर खेळाडूला गंभीर दुखापत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 2, 2022

जडेजा, बुमरानंतर भारतीय संघाला बसला आहे अजून एक धक्का, मॅचविनर खेळाडूला गंभीर दुखापत

https://ift.tt/oeuHSaC
नवी दिल्ली : रवींद्र जडेजा आणि त्यानंतर जसप्रीत बुमरा यांच्यानंतर भारतीय संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा एक मॅचविनर खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण बुमराची जोरदार चर्चा झाल्यामुळे या खेळाडूला संघाबाहेर करण्यात आले, हे कोणाला जास्त समजले नाही. फार कमी वेळात आपल्या नेत्रदीपक खेळामुेळ त्याने आपले स्थान निश्चित केले होते. संघासाठी तो हुकमी एक्का ठरत होता. त्यामुळेच विजय मिळवण्यासाठी त्याचा भारतीय संघ शिताफीने वापर करत होता. विश्वचषकाच्या संघातही त्याची निवड करण्यात आली. पण आता दक्षिण आफ्रिकेची मालिका सुरु होण्यापूर्वीच त्याला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता तो बुमराबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीवर उपचार घेत आहे. आपल्या दमदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर दीपक हुडाने भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. पण हुडाला पाठीची दुखापत झाली आणि भारतीय संघातून त्याला बाहेर करण्यात आले. पण बुमराची जोरदार चर्चा सुरु असून अजूनही बऱ्याच जणांना हुडालाही दुखापत झाली आहे आणि विश्वचषकापूर्वी भारताला बसलेला हा तिसरा धक्का आहे, हे बऱ्याच जणांच्या आता गावीही नाही. दीपकने फार कमी कालावधीमध्ये दमदार कामगिरी केली. त्याचबरोबर काही वेळा तर त्याने आपल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचा नवा मॅचविनर म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. पण आता त्यालाही पाठीची दुखापत झाली आहे. त्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे तो आता दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत खेळणार नाही. पण विश्वचषकापर्यंत तो फिट होणार की नाही, याबाबत बीसीसीआयने कोणतेही अपडेट्स दिलेले नाहीत. विश्वचषकाच्या संघाबरोबर त्याला ऑस्ट्रेलियाला नेण्यात येणार की नाही, याबाबत अजूही स्पष्टता नाही. त्यामुळे दीपकच्या दुखापतीचे स्वरुप नेमके काय आहे, याबाबत बऱ्याच जणांच्या मनात शंका आहे. दीपक जर विश्वचषकासाठी फिट नसले तर भारतीय संघासाठी हा तिसरा मोठा धक्का असेल. त्यामुळे आता भारताच्या संघातील अष्टपैलू खेळाडूंची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे हुडा फिट होणार नसेल तर त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचे, याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयला करावा लागणार आहे. त्यामुळे आता दीपकबाबत कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.