जुन्नरमध्ये शरद पवारांचीच चर्चा, मोदींना शुभेच्छा देत जीवन संपविणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी दिली भेट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 3, 2022

जुन्नरमध्ये शरद पवारांचीच चर्चा, मोदींना शुभेच्छा देत जीवन संपविणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी दिली भेट

https://ift.tt/ZnLrQSK
(): राष्ट्रवादीचे अध्यक्ष (Sharad Pawar) हे शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी उभे असतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहे. त्यातच त्यांचा शेतकऱ्यांप्रती असणारा आदर आज पुन्हा एकदा दिसून आला. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने कांद्याला हमीभाव मिळत नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आत्महत्या केली होती. त्यानंतर या शेतकऱ्याची चर्चा राज्यभर झाली होती. जुन्नरमधील शेतकरी दशरथ केदारी () या शेतकऱ्याच्या घरी जाऊन शरद पवार यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट देत त्यांचे सांत्वन केले. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्याच्या फोटोंचे दर्शनही घेतले. ( visited the house of a farmer) केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाची झळ आता जुन्नरसारख्या बागायती क्षेत्रालाही बसू लागली आहे. त्यामुळे केदारींसारखे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. ही घटना आपल्या सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना राज्य सरकारने योग्य ती मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे. शेतकरी हा लाखांचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान राखला पाहिजे, असे शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्वरित लक्ष देऊन प्राधान्यक्रमाने ते सोडवणे अपेक्षित आहे. अशी वेळ इतर शेतकऱ्यांना येऊ नये याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- शरद पवारांच्या या भेटीने अनेक निष्कर्ष लावले जात आहेत. एवढ्या सामान्य शेतकऱ्याच्या घरी शरद पवार यांनी भेट दिली. त्यामुळे सामान्यांसाठी असणारा लोकनेता जिंवत असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा-