भारताने सामना जिंकला; पण रोहित शर्मासाठी धोक्याची घंटा, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 3, 2022

भारताने सामना जिंकला; पण रोहित शर्मासाठी धोक्याची घंटा, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं...

https://ift.tt/1twzchp
गुवाहाटी : भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय साकारला. पण तरीही भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी आता धोक्याची घंटा वाजलेली आहे. कारण रोहितचा एक व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहिताबबत नेमकं घडलं तरी काय, हे दिसत आहे. रोहितने आजच्या सामन्यात इतिहास रचला. कोणत्याही कर्णधाराला जे जमलं नव्हतं ते रोहितने करून दाखवलं. पण तरीही रोहितसाठी या सामन्यात एक धोक्याची घंटा वाजलेली आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी रोहितने काळजी घेतली नाही तर ही गोष्ट भारतीय संघाच्या चांगलीच अंगलट येऊ शकते. भारतीय संघ जेव्हा फलंदाजीला आला होता. तेव्हा रोहितने एक साहसी फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रोहितच्या हाताला जोरदार फटका बसल्याचे पाहायला मिळाले. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे रोहितसाठी डॉक्टरांनी मैदानात धाव घेतली. डॉक्टरांनी यावेळी रोहितच्या बोटांवर स्प्रे मारला आणि हे बोट त्यांनी सुन्न केले. त्यामुळे रोहित काही काळ फलंदाजी करू शकला. पण रोहितच्या बाबतीत फक्त एवढेच घडले नाही, तर भारतीय संघ गोलंदाजी करत असतानाही रोहितला गंभीर दुखापत झाली. भारतीय संघ गोलंदाजी करत असताना तर रोहितच्या नाकातून रक्त यायला सुरुवात झाली. ही गोष्ट एवढी गंभीर होती की, काही काळ त्याला काही करताच आले नाही. त्यानंतर मात्र रोहितने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. रोहित मैदान सोडून गेल्यावर लोकेश राहुलने काही काळ कर्णधारपद भूषवले खरे. पण रोहितला आता एकाच सामन्यात दोनदा दुखापती झाल्या आहेत. विश्वचषकापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना झालेल्या दुखापती सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे विश्वचषक आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रोहितने आता कोणतीही जोखीम उचलता कामा नये. या सामन्यात दोनदा दुखापत होत रोहितसाठी ही धोक्याची घंटा वाजेलली आहे. त्यामुळे आता रोहितला जेवढी विश्रांती मिळेल, तेवढे भारतासाठी चांगले असेल. त्यामुळे आता रोहित तिसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचेही म्हटले जात आहे.