खोके सरकार निवडणुकीसह आणखी एका गोष्टीला घाबरतं,आदित्य ठाकरेंचं शिंदे सरकारच्या वर्मावर बोट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 27, 2022

खोके सरकार निवडणुकीसह आणखी एका गोष्टीला घाबरतं,आदित्य ठाकरेंचं शिंदे सरकारच्या वर्मावर बोट

https://ift.tt/5EL7ejt
मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार हे देवाला आणि कोर्टाला माहिती असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यासंदर्भात आदित्य ठाकरेंना विचारलं असता मुख्यमंत्री कोण पण हे देवाला माहिती, असा टोला आदित्य ठाकरे यानी लगावला. खोके सरकार कुठंही निवडणूक घ्यायला घाबरतं. खोके सरकार निवडणूक घ्यायला तयार नाही, असंही ते म्हणाले. गिरीश महाजन यांनी जनतेच्या मनात काय आहे हे पाहावं. ज्यांनी माझ्या परिवारावर, आईवर घाणेरडे आरोप केले त्यांच्यांसदर्भात बोलायचं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईकर म्हणून सणवार आणि राजकारण याच्यात फरक करता आलं आहे. ही उधळपट्टी नेमकी कुणाच्या पैशातून करण्यात येत आहे, हे पाहावं लागणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. हे जर सरकार निवडणुकीला घाबरत नसं तर ४० लोकांनी राजीनामे दिले असते आणि सामोरे गेले असते, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार नाहीत, निवडणूक लढायला सामोरं जायला ते घाबरत आहेत.मंत्रिमंडळ विस्ताराला आणि निवडणुकीला हे सरकार घाबरतं, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रासंदर्भातील माहिती चुकीची असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे पुणे नाशिकच्या दौऱ्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा अतिवृष्टी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही नेते उद्या नाशिक आणि पुणे जिल्ह्यात पाहणी करतील. नाशिकमधील सिन्नर, पुण्यातील जुन्नर, शिरुर तालुक्यातील गावांना भेटी देणार आहेत. आदित्य ठाकरेंचा दौरा नाशिकापासून सुरु होईल आणि पुण्यात संपेल