२ महिने, २ घटना, उद्धव ठाकरेंनी RSS-BJP ला घेरलं, मोहन भागवतांना रोकडे सवाल! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 6, 2022

२ महिने, २ घटना, उद्धव ठाकरेंनी RSS-BJP ला घेरलं, मोहन भागवतांना रोकडे सवाल!

https://ift.tt/RZg0khz
मुंबई : भाजपकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं... कुठेतरी जायचं आणि थडगं सजवल्यावरुन आम्हाला प्रश्न विचारायचे... पाकिस्तानमध्ये जाऊन जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणाऱ्या तुमच्या पक्षाची अवलाद... तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकू?? हिंदुत्व खणखणीत असलं पाहिजे.. पाकिस्तानात न बोलवता केक खायला कोण गेलं होतं? मोहन भागवत मशिदीत जाऊन आले, हिंदुत्व सोडलं होतं काय? की मिंधे गटाने नमाज पडायला सुरुवात केली होती? आज मोहन भागवत म्हणाले, स्त्री आणि पुरुषामध्ये फरक असता कामा नये. समानता असली पाहिजे. बरोबर आहे मोहनजी.. आमच्या शिवरायांची शिकवण पण पर स्त्रीला मातेसमान मानण्याची आहे. पण मला एक सांगा उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीचा खून झाला. एका रिसोर्टच्या बाजूला मृतदेह आढळला. हॉटेल मालक भाजपचा होता. त्यावर काय कारवाई केली कुठे महिला शक्तीचा आदर झाला. तिची आई अजूनही आक्रोश करत आहे... दुसरं प्रकरण बिल्कीस बानो... गर्भवती मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. आरोपी शिक्षा भोगत होते. पण गुजरात सरकारने त्यांची शिक्षा माफ केली. भाजप नेत्यांनी आरोपींचं स्वागत केलं. हेच भाजपचे विचार काय...?, अशी मांडणी करत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला चहूबाजूंनी घेरलं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो... म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. शिवतीर्थावर उपस्थित हजारो शिवसैनिकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी गर्दीने फुलून गेलेल्या शिवतीर्थावरील निष्ठावान शिवसैनिकांना अभिवादन केलं. डॉक्टरांनी मला खाली वाकायची परवानगी दिलेली नाहीये, पण तुमच्या निष्ठेचा सागर पाहून मी भारावून गेलोय, तुम्हाला अभिवादन केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही, अशा शब्दात त्यांनी शिवसैनिकांचं ऋण व्यक्त केलं. पुढच्या काहीच मिनिटांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर आसूड ओढायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील लोकशाही जिवंत राहील का? ही सध्या चिंता वाटतीये. तुम्हाला सर्वांना हा सावधानतेचा इशारा आहे. पुन्हा गुलामगिरी येईल. देशप्रेमींनी एकत्र यावे. भागवतांच्याबद्दल आदर. ते मशिदीत गेले होते मुस्लिमांशी संवाद करायला... तिथे मुस्लमानांनी सांगितले ते राष्ट्रपिता... मग आम्ही तर आधीच भागवतांना राष्ट्रपती करा म्हटलो होतो... भाजपच्या बेगडी हिंदुत्वप्रेमाचा बुरखा आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सर्व जातीधर्माच्या व्यक्तींना सोबत घेऊन जायचंय. कुणा एका धर्माचा द्वेष करुन त्यांच्यावर अन्याय करायचा नाही, असं उद्धव म्हणाले. शिंदे गटावर हल्लाबोल "विजयादशमीच्या शुभेच्छा देत असताना जुने दसरा मेळावे आजही लक्षात आहे. मी भारावून गेलो आहे असा मेळावा क्वचितच. तुमचं प्रेम बघितल्यावर मुद्दे सुचत नाही. पण हे प्रेम विकत घेता येत नाही. माझ्या जीवाभावाची गर्दी म्हणून तुमच्यासमोर नतमस्तक. मुख्यमंत्री म्हणून नतमस्तक झालो होतो. अनुभव नव्हता. डॉक्टरांकडून वाकण्याची परवानगी नाही पण तुमच्या समोर नेहमीच नतमस्तक. तुम्ही माझे जिवंत सुरक्षाकवच. तुमच्या साक्षीने सांगतो गद्दारांना गद्दारच म्हणणार... मंत्रिपद काही काळ पण गद्दारीचा शिक्का नेहमीच कपाळावर राहिल. शिवसेनेचे काय होणार मला मात्र चिंता नव्हती. ही गर्दी बघितली तर आता प्रश्न गद्दारांचे कसे होणार. माताभगिनी, दिव्यांग सगळेच आहेत. एकनिष्ठ इथेच आहेत. ही ठाकरेंची कमाई.."