राणीच्या बागेतही रांगा टाळा! १६०व्या वर्षसांगतेनिमित्त आजपासून ऑनलाइन तिकीट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 19, 2022

राणीच्या बागेतही रांगा टाळा! १६०व्या वर्षसांगतेनिमित्त आजपासून ऑनलाइन तिकीट

https://ift.tt/WZfAS0N
मुंबई : भायखळ्याच्या वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानाच्या १६०व्या वर्षाची सांगता आज, १९ नोव्हेंबरला होणार आहे. यानिमित्त आजपासून उद्यानाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ऑनलाइन तिकिट उपलब्ध होणार आहे. राणीच्या बागेच्या १६० वर्षांच्या सांगतेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात ऑनलाइन तिकीट प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांना घरूनच तिकीट नोंदवता येईल. क्यूआर कोड स्कॅन करूनही हे तिकीट काढता येणार आहे. यासाठी किऑस्कची सोय करण्यात आली असून, यामुळे रांगांमध्ये उभे राहून तिकीट काढण्याचा वेळ वाचणार असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाच्या उपअधीक्षक डॉ. कोमल राऊळ यांनी दिली. कवितासंग्रह, माहितीपट राणीच्या बागेची ओळख करून देण्यासाठी कवितासंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. बालसाहित्यिक केटी बागली यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये कवितांची निर्मिती केली आहे. प्राण्यासंदर्भातील वास्तव सोप्या भाषेत मुलांपर्यंत पोहोचवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. महापालिकेच्या माध्यमातून पुस्तकाचे दर ठरवून ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या पुस्तकासोबतच ‘मी राणी बाग बोलतेय’ हा माहितीपटही प्रदर्शित करण्यात आला आहे. उद्यानाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा या माध्यमातून वेध घेण्यात आला आहे. उद्यानात खतविक्री राणीच्या बागेत तयार होणाऱ्या गांडूळ खतनिर्मितीचा वापर केवळ उद्यानासाठी केला जायचा. मात्र १६०व्या वर्षाच्या निमित्ताने या खताची विक्री मुंबईकरांसाठी केली जात असून, याला उत्साही प्रतिसाद मिळत असल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले. हे खत तिकीट खिडकीपाशी उपलब्ध होते. वनस्पती उद्यान म्हणून ओळख ‘द सेव्ह राणी बाग बॉटनिकल गार्डन फाऊंडेशन’च्या वतीने गेल्या सात वर्षांपासून उद्यानाला वनस्पती उद्यानाची ओळख मिळावी यासाठी प्रयत्न होत होते. ते अखेर यशस्वी झाले आहेत. या उद्यानाला वनस्पती उद्यानाची अधिकृत ओळख मिळाली आहे. विकास आराखडा २०३४मध्ये राणीच्या बागेची ओळख वनस्पती उद्यान म्हणून नोंदवण्यात आली आहे. या उद्यानामध्ये ८५३ प्रकारची झाडे असून, एकूण त्यांची संख्या तीन हजारांच्या वर आहे.