मुंबईतील राणीच्या बागेत आनंदी आनंद; तीन पेंग्विन पिल्लांचा जन्म, काय नावे ठेवली पाहा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 19, 2022

मुंबईतील राणीच्या बागेत आनंदी आनंद; तीन पेंग्विन पिल्लांचा जन्म, काय नावे ठेवली पाहा

https://ift.tt/3OioTeN
मुंबई: पक्षीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी... राणीबाग किंवा भायखळा प्राणीसंग्रहालय म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील लोकप्रिय वीरमाता जिजाबाई भोसले (VJB) उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात गेल्या काही महिन्यांत तीन नवीन हम्बोल्ट पेंग्विनचा जन्म झाल्याची घोषणा अधिकाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी या संग्रहालयाला १६० वर्षे पूर्ण होत असताना ही बातमी आल्याने संग्रहालयात आनंदाचे वातावरण आहे. (birth of three new penguins) तीन नवीन पेंग्विन पिलांची फ्लॅश, बिंगो आणि अलेक्सा अशी छान नावे ठेवण्यात आली आहेत. फ्लॅश हा नर असून तो २ एप्रिल २०२२ रोजी जन्माला आला, तर बिंगो हा नर २६ एप्रिल २०२२ रोजी जन्मला आणि अलेक्सा ही मादी ९ ऑगस्ट २०२२ रोजी जन्मला आली. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, डोनाल्ड (नर) आणि डेझी (मादी) या पेंग्विनच्या जोडीने दोन अंडी घातली आणि ९ ऑगस्ट रोजी एक नर पिल्लू अलेक्सा जन्माला आला. तसेच आणखी एक प्रजनन जोडी - मोल्ट (नर) आणि फ्लिपर (मादी) यांनी एकच अंडे घातले आणि २६ एप्रिल २०२२ रोजी एक पिल्लू बिंगो जन्माला आले. मागील वर्षी देखील, डोनाल्ड (पुरुष) आणि डेझी (मादी) या जोडीने एकच अंडे घातले होते. तेव्हा १ मे २०२१ रोजी 'ओरिओ' नावाचे नर पिल्लू जन्मालाआले. तसेच आणखी एक प्रजनन जोडी - मोल्ट (नर) आणि फ्लिपर (मादी) - यांनी एकच अंडे घातले आणि १९ ऑगस्ट २०२२ रोजी एक पिल्लू जन्माला आले. या बरोबरच या प्राणीसंग्रहालयात हम्बोल्ट पेंग्विनची एकूण संख्या आता १२ झाली आहे. अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे प्राणिसंग्रहालयात प्रवेशासाठी रांगेत उभे न राहता ऑनलाइन तिकीट सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार जनतेला याची माहिती देण्यासाठी परिसरात सर्वत्र क्यूआर कोड प्रदर्शित केले जात आहेत. आता लोकांना https://ift.tt/d0E3kM6 या लिंकचा वापर करून तिकीट बुकिंग करता येईल. २६ जुलै २०१६ रोजी, दक्षिण कोरियातील कोएक्स एक्वॅरियम, सोल येथून मुंबई प्राणीसंग्रहालयात तीन नर आणि पाच मादी पेंग्विन आणण्यात आले. जेव्हापासून त्यांना आणले गेले तेव्हापासून त्यांना क्वारंटाईन सुविधेत ठेवण्यात आले होते. तेथे तापमान १६-१८ इतके अंश सेल्सिअस होते. ऑक्टोबर २०१६ मध्ये, सकाळी ८.३० च्या सुमारास एका मादी हम्बोल्ट पेंग्विन (हिरव्या-निळ्या) या सुमारे ३ किलो वजनाच्या पक्षात निस्तेजता, अशक्तपणा, हिरवट मल आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याची लक्षणे दिसून आली. याच या पेंग्विनचा मृत्यू झाला. पुढील वर्षी, उर्वरित पेंग्विनपैकी सात पेंग्विन मार्च २०१७ मध्ये एका छानपैकी वातावरणात हलवण्यात आले. ५ जुलै २०१८ रोजी मोल्ट आणि फ्लिपर या पेंग्विन जोडीने अंडी घातली. तथापि, अंड्यातील पिवळे बलक गोळा होणे आणि आणि यकृत बिघडणे यासारख्या जन्मजात विसंगतींमुळे २२ ऑगस्ट २०१८ रोजी ही पिल्ले मरण पावली.