घरमालकीण भाडेकरूच्या घरात गेली होती, इतक्यात झाला गॅस सिलिंडरचा स्फोट, तिघे भाजले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 20, 2022

घरमालकीण भाडेकरूच्या घरात गेली होती, इतक्यात झाला गॅस सिलिंडरचा स्फोट, तिघे भाजले

https://ift.tt/bakRhZz
: जालना शहराच्या जुना जालना परिसरातील सिद्धिविनायकनगर येथील ताराबाई केशव जाधव (वय, ६५) यांच्या घरातील भाडेकरू मीना दिलीप घारे (वय, ३८ वर्षे) यांच्या घरातील गॅस सिलेंडर मधून आज रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक गळती होऊन स्फोट झाला. यावेळी उडालेल्या भडक्यात ताराबाई जाधव आणि मीना दिलीप घागरे घारे यांच्या साडीने अचानक पेट घेतल्याने त्या गंभीररित्या भाजल्या आहेत. (three people were burnt in a gas cylinder explosion) ताराबाई जाधव आणि मीना घारे या ६० टक्के भाजल्या असून त्यांना परिसरातील नागरिकांनी धावपळ करून जालन्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु आवश्यक त्या उपचारासाठी त्यांना नंतर औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविले आहे. या स्फोटात भाजलेल्या अनंता मंडलिक यांच्यावर मात्र जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्लिक करा आणि वाचा- या दुर्घटनेत शेजारच्या किराणा दुकानातील अनंता दत्ता मंडलिक (वय, ४५ वर्षे) हे देखील गॅसच्या वाफेने भाजले आहेत. सदरील घटनेची माहिती मिळतात कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर यांच्यासह पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि परिसर परिसरातील रहिवाशांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले. क्लिक करा आणि वाचा- अचानक घडलेला हा सिलेंडरचा स्फोट व त्यानंतर महिलांचा आरडाओरडा यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र तिथल्या काही नागरिकांनी वेळेचे भान राखत धावपळ करून अग्निशमन दलाला आणि पोलिसांना वेळीच कळवल्यामुळे मोठी हानी टळली आहे. क्लिक करा आणि वाचा-