गुजरातमध्ये निवडणूक ड्यूटीवर असलेल्या CRPF जवानाचा आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार, २ जवान शहीद, दोन जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 27, 2022

गुजरातमध्ये निवडणूक ड्यूटीवर असलेल्या CRPF जवानाचा आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार, २ जवान शहीद, दोन जखमी

https://ift.tt/obJemq5
अहमदाबाद: गुजरातमधील पोरबंदरजवळील एका गावात शनिवारी संध्याकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने काही कारणावरून आपल्या सहकाऱ्यांवर केला. यामध्ये दोन जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. हे जवान मणिपूरच्या सीआरपीएफ बटालियनचे आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने या जवानांना येथे पाठवले आहे, अशी माहिती पोरबंदरचे डीएम आणि जिल्हा निवडणूक अधिकारी ए.एम. शर्मा यांनी दिली आहे. पोरबंदर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला मतदान होणार आहे. डीएम ए. एम. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफचे जवान पोरबंदरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या तुकडा गोसा गावात एका केंद्रात थांबले होते. शनिवारी संध्याकाळी एका जवानाने काही वादातून त्याच्या साथीदारांवर असॉल्ट रायफलने गोळीबार केला. या घटनेत दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जवान जखमी झाले. क्लिक करा आणि वाचा- जखमी जवान जामनगर रुग्णालयात दाखल जखमी जवानांना जामनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील एका जवानाच्या पोटात तर दुसऱ्याच्या जवानाच्या पायात गोळी लागली आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली. पोलीस या गोळीबार प्रकरणाचा तपास करत असल्याचेही ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- पोरबंदरमध्ये १ डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान पोरबंदरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या तुकडा गोसा गावात हे जवान चक्रीवादळ केंद्रात थांबले होते. या केंद्राचा वापर सीआरपीएफ जवानांसाठी निवारा म्हणून केला जात आहे. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पोरबंदर जिल्ह्यात १ डिसेंबरला मतदान होणार आहे. क्लिक करा आणि वाचा-