
नवी दिल्ली: भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. मालिकेतील तिसरी आणि अखेरची मॅच उद्या म्हणजे मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी मॅक्लीन पार्क नेपियर येथे होणार आहे. मालिकेतील पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली होती. दुसऱ्या सामन्यात देखील प्रथम फलंदाजी करताना पावसाने अडथळा आणला होता. मात्र तेव्हा ग्राउंडसमॅनच्या कौशल्यामुळ ओव्हर कमी न करता सामना पार पडला. भारताने दुसरी मॅच ६५ धावांनी जिंकली. दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या विजयाचे हिरो ठरला सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा होय. सूर्याने ५१ चेंडूत ११ धावांची नाबाद खेळी केली. तर दीपक हुड्डाने ४ विकेट घेतल्या. दीपक हुड्डाने या कामगिरीसह न्यूझीलंडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकले. वाचा- भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. मात्र हार्दिक पंड्याच्या या स्वप्नांवर पाऊस खो घालू शकतो. तिसरी टी-२० मॅच नेपियर येथे होत असून मंगळवारी संध्याकाळी येथे ९८ टक्के ढगाळ हवामान असणार आहे. तर आद्रता ६४ टक्के इतकी असले असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाचा- नेपियरमधील तापमान २२ डिग्री इतके असेल तर पावसाची शक्यता २५ टक्के इतकी आहे. यामुळे चाहत्यांना संपूर्ण मॅचचा आनंद मिळण्याची शक्यता अधिक आहे. वाचा- पिच रिपोर्ट.... नेपियरमधील मॅक्लीन पार्क येथे टीम इंडिया प्रथमच एखादी टी-२० मॅच खेळत आहे. याआधी भारताने या मैदानावर ७ वनडे आणि २ कसोटी सामने खेळले आहेत. ढगाळ हवामान असल्याने सुरुवातीला जलद गोलंदाजांना मदत मिळू शकते. या मैदानावरील टी-२० क्रिकेटचा विचार केला तर येथे झालेली अखेरची टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली होती. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या २४१ असून जी इंग्लंडने २०१९ साली केली होती.