Share Market Opening Bell: सेन्सेक्स १५० अंकांनी खाली, IT स्टॉकेसमध्ये मोठी घसरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 17, 2022

Share Market Opening Bell: सेन्सेक्स १५० अंकांनी खाली, IT स्टॉकेसमध्ये मोठी घसरण

https://ift.tt/pGRvw47
मुंबई: जगातील संकेतांच्या बळावर आज भारतीय शेअर बाजारात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १७० अंकांनी घसरून ६१,८१२ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५१ अंकांनी घसरून १८,३५८ वर उघडला. मात्र, सध्या बाजारात किंचित रिकव्हरी खालच्या स्तरावरून दिसून येत आहे आणि सेन्सेक्स सध्या ५४ अंकांनी तर निफ्टी २६ अंकांनी खाली व्यवहार करत आहे. क्षेत्रीय निर्देशकांची स्थिती बाजारातील घसरणीदरम्यान फार्मा, एफएमसीजी, ऊर्जा, इन्फ्रा आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे बँकिंग, ऑटो, आयटी, धातू क्षेत्राच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून येत आहे. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी १३ समभागांचे तेजीने व्यवहार होत आहेत, तर १७ समभागांमध्ये घसरण होत आहे. निफ्टीच्या ५० समभागांपैकी २४ समभाग तेजीने व्यवहार करत आहेत तर २६ समभाग घसरत आहेत. याशिवाय मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही घसरण आहे. शेअर बाजाराचे मार्केट कॅप सध्या २८४.३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. व्यवहाराच्या सुरुवातीला कोणते शेअर्स वधारले बाजारातील घसरण असूनही शेअर्सवर नजर टाकल्यास लार्सन १.२९ टक्के, पॉवर ग्रिड १.०८ टक्के, सिप्ला ०.९८ टक्के, टाटा कंझ्युमर ०.७१ टक्के, भारती एअरटेल ०.६२ टक्के, सन फार्मा ०.६१ टक्के, अदानी एंटरप्रायझेस ०.५४ टक्के, अ‍ॅक्सिस बँक ०.३४ टक्के. टक्के, आयसीआयसीआय बँक ०.४२ टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंट ०.४२ टक्क्यांनी वधारत आहे. कोणते शेअर्स घसरले जर आपण घसरत असलेल्या समभागांवर नजर टाकली तर, टाटा मोटर्स २%, टायटन कंपनी १.५८%, हिंदाल्को १.३६%, टेक महिंद्रा १.३५%, आयशर मोटर्स १.३४%, टाटा स्टील १.२७%, एचसीएल टेक १.०३%, जेएसडब्ल्यू स्टील १%, TCS ०.९४ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. दरम्यान, यापूर्वी गुरुवारी जागतिक बाजारांनी घसरणीचे संकेत दिले. SGX निफ्टी ६७ अंकांनी घाला. तर अमेरिकेचा डाऊ जोन्सही ०.१२ टक्क्यांनी घसरून बंद झाला. तसेच आशियाई बाजारावरही दबाव दिसला. जपानचा निक्केई ०.१५% आणि कोरियाचा कोस्पी ०.५०% खाली घाला आहे. याआधी बुधवारी भारतीय बाजार १०८ अंकांच्या वाढीसह बंद झाला होता. बुधवारच्या व्यवहारात एका टप्प्यावर सेन्सेक्सने ६२,०५२ अंकांची पातळी गाठली होती.बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी खाली, IT स्टॉकेसमध्ये मोठी घसरण