पुणे हादरलं! जेवताना मटणाच्या सुपात भाताचे कण, दोघांनी वेटरला संपवलं; थरारक Video - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 17, 2022

पुणे हादरलं! जेवताना मटणाच्या सुपात भाताचे कण, दोघांनी वेटरला संपवलं; थरारक Video

https://ift.tt/EsgD2Wa
पुणे (पिंपरी) : पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. काल जुन्नर येथे एकाने तंबाखूसाठी पैसे दिले नाही म्हणून डोक्यात फावडे टाकून हत्या केली. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळे सौदागर परिसरात असणाऱ्या सासुरवाडी नावाच्या हॉटेल मध्ये मटणाच्या सुपात भात आल्याने वेटरची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगेश पोस्ते (वय १९) असे हत्या झालेल्या वेटरचे नाव असून यात अजित मुटकुळे (वय ३२) आणि सचिन भवर (वय २२) अशी त्याच्या सोबत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या दोघांना देखील लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांत विजयराज वाघिरे आणि त्याच्या साथीदारांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाले असल्याचे सांगवी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी विशाल महादू रजाळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर परिसरात सासुरवाडी नावाचे एक मटणाचे हॉटेल आहे. या ठिकाणी खानावळ देखील चालवली जाते. आरोपी विजयराज आणि त्याचा मित्र हे नेहमी या ठिकाणी जेवायला जात होते. नेहमीप्रमाणे हे दोघे जेवणासाठी खानावळीत आले. मात्र, त्यांच्या मटणाच्या सूपमध्ये भाताचे काही कण आढलून आले. त्यामुळे आरोपी विजयराज आणि त्याच्या साथीदाराला राग अनावर झाला. त्यांनी वेटर अजित अमूत मुठकुळे, सचिन सुभाष भवर आणि मृत मंगेशला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हॉटेलची सर्व्हिस चांगली नाही. जेवण ही चांगले देत नाही म्हणत तिघांना त्यांनी मारहाण सुरूच ठेवली. यात मंगेश हा गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी आणि त्याचा मित्र हा हॉटेलमधून फरार झाले. त्यांच्या मारहाणीत इतर दोन वेटर देखील जखमी झाले. जखमीवर उपचार सुरू असून सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने मात्र परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.