पोलिस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना अर्ज करण्याचा मार्ग खुला; वेबसाइटमध्ये महत्त्वाचा बदल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 13, 2022

पोलिस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना अर्ज करण्याचा मार्ग खुला; वेबसाइटमध्ये महत्त्वाचा बदल

https://ift.tt/5IptTzP
मुंबईः पोलिस भरती प्रक्रियेत तृतीयपंथींना अर्ज करण्याचा मार्ग खुला झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारल्यानंतर तृतीयपंथींना आता पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आजपासून पावलं देखील उचलली आहे. 'पोलिस भरती २०२१'च्या संकेतस्थळावर तृतीयपंथी व्यक्तीसाठी पर्याय उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार policerecruitment२०२२.mahait.org या संकेतस्थळावर तृतीयपंथी व्यक्तींसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा पर्याय पोलिस शिपाई आणि पोलिस शिपाई चालक या पदासाठी १३ डिसेंबर २०२२ पासून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं? पोलीस भरती २०२१मध्ये उच्च न्यायालयाने तृतीयपंथींसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबत ९ डिसेंबर रोजी आदेश दिले होते. त्यावर पोलिस भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत सरसकट १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून त्यात तृतीयपंथीयांनाही अर्ज करता यावा यादृष्टीने १३ डिसेंबरपर्यंत वेबसाइटवर ‘तृतीयपंथीय’ हा तिसरा पर्याय उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही सरकारने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दिली होती. त्यानुसार गृह विभागाने हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.