KKR vs MI : कॉर्बिन बॉशचा फिनिशिंग टच, मुंबईच्या 147 धावा, केकेआर निर्णायक सामन्यात जिंकणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 21, 2026

KKR vs MI : कॉर्बिन बॉशचा फिनिशिंग टच, मुंबईच्या 147 धावा, केकेआर निर्णायक सामन्यात जिंकणार?

KKR vs MI : कॉर्बिन बॉशचा फिनिशिंग टच, मुंबईच्या 147 धावा, केकेआर निर्णायक सामन्यात जिंकणार?

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 स्पर्धेतील 65 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. मुंबईच्या रायन रिकेल्टन आणि नमन धीर या दोघांचा अपवाद वगळता इतर सर्वांनी दुहेरी आकड्यात धावा केल्या. मात्र त्यापैकी एकालाही मुंबईसाठी मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या क्षणी कॉर्बिन बॉश याने अखेरच्या क्षणी गेम फिरवला. कॉर्बिन बॉश याने जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्यामुळे मुंबईला केकेआरसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. मुंबईचं या मोसमातील आव्हान संपुष्ठात आलं आहे. तर केकेआरसाठी प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणं बंधनकारक आहे. त्यामुळे केकेआर या धावा करुन सामना जिंकणार की मुंबई मैदान मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.