धावता-धावता ५७ वर्षीय वडिलांनी प्राण सोडले; २ मुलींच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 19, 2022

धावता-धावता ५७ वर्षीय वडिलांनी प्राण सोडले; २ मुलींच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं

https://ift.tt/dksp3jl
उस्मानाबाद : उस्मानाबाद स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या वतीने आयोजित हाफ मॅरेथॉनमध्ये धावत असताना अचानक चक्कर आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हनुमंत केरबा पाटील (वय ५६) असं मृत व्यक्तीचं नाव असून ते शहरातील स्काऊट गाईड येथे शिपाई म्हणून कार्यरत होते. मॅरेथॉनमध्ये धावताना पाटील यांचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी उस्मानाबाद स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या वतीने हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत हनुमंत पाटील यांनीही सहभाग घेतला होता. सकाळी तुळजाभवानी क्रीडा मैदान येथून निघालेल्या मॅरेथॉनमध्ये ते धावत होते. शहरातील पोलीस मुख्यालयाशेजारील लोकमंगल मल्टिस्टेटच्या शाखेजवळ आल्यानंतर चक्कर आल्याने पाटील हे खाली बसले. त्यावेळी तेथील पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांना वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली, असा परिवार आहे. दरम्यान, हनुमंत पाटील हे शहरातील स्काऊट गाईड कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. अत्यंत कमी मानधनावर ते शिपाई म्हणून काम करत असत. तर त्यांची पत्नी इतरांच्या घरी धुणी-भांडी करून मुलींच्या शिक्षणासाठी पैसे उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची एक मुलगी बारावी तर दुसरी नववीच्या वर्गात शिकत आहे. पाटील यांच्या जाण्याने मुलींच्या भवितव्याची चिंता अधिकच गडद झाली आहे.