पालघर हादरले! त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे निघाले पीडितेचे मित्र, धक्कादायक माहिती समोर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 19, 2022

पालघर हादरले! त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे निघाले पीडितेचे मित्र, धक्कादायक माहिती समोर

https://ift.tt/6ktvfG9
म. टा. वृतसेवा, पालघरः पालघर जिल्ह्यातील माहीम येथील सातपाटी सागरी पोलीस ठाण्या अंतर्गत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराचे घडलेले हे दुष्कृत्य तिच्या मित्रांकडून झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत या नराधमांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी आठ जणांना अटक केली असून या आरोपींना २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची ही पहिली घटना असून यामुळे जिल्ह्यातील अन्य मुलींचे पालक प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे सर्व आरोपी २० ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. हे आरोपी पालघर तालुक्यातील माहीम, टेंभी, वडराई, सफाळे-मथाणे, हनुमान पाडा येथील असून यातील काहीजण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे समजते. पोलिसांनी पालघर तालुक्यातील तन्मय धनंजय चौधरी (माहीम), आकाश हाडळ (रेवाळे), रवी दळवी (रेवाळे), केतन करबट (रेवाळे), श्याम धापशी (रेवाळे), आशीष पंडित (रेवाळे), विनय घरत (वडराई) व ऋतिक पाटील (मथाणे) अशा आठ जणांना आतापर्यंत अटक करून त्यांच्यावर पोस्को व बलात्कारासह विविध आठ कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती ठीक नसल्याने तिला मुंबईतील सर जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.