प्रवाशांनो लक्ष द्या! दहा मेल एक्स्प्रेस विलंबाने धावणार, मध्य रेल्वेवरील दोन लोकलच्या वेळेत बदल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 24, 2022

प्रवाशांनो लक्ष द्या! दहा मेल एक्स्प्रेस विलंबाने धावणार, मध्य रेल्वेवरील दोन लोकलच्या वेळेत बदल

https://ift.tt/lct4ep0
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः कल्याण ते कसारा स्थानकांदरम्यान विविध पायाभूत सुविधांचे काम करण्यासाठी आज, शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ५.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दोन लोकलमधील वेळेत बदल करण्यात आला असून दहा मेल एक्स्प्रेस सुमारे तासभर विलंबाने धावणार आहेत. गाडी क्रमांक २२५३८ एलटीटी ते गोरखपूर एक्स्प्रेस व गाडी क्रमांक ११४०२ आदिलाबाद ते मुंबई एक्स्प्रेस या गाड्यांना खडवली ते कसारादरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या मार्गांवर ब्लॉक - कसारा ते आटगाव अप – वेळ – १२.३० ते ०३.४५ - वाशिंद ते आटगाव अप आणि डाउन, वेळ – ०२.२० ते ०४.२० - खडवली ते आसनगाव अप आणि डाउन, वेळ – ०२.०५ ते ०५.०५ - खडवली ते आंबिवली अप, वेळ – १.४० ते ४.४० परिणाम काय? -रात्री १०.५० ची सीएसएमटी-कसारा लोकल आटगाव स्थानकात रद्द -रात्री १२.१४ ची सीएसएमटी-कसारा आणि ३.५१ कसारा-सीएसएमटी लोकल रद्द या एक्स्प्रेस विलंबाने धावणार २०२०४ गोरखपूर - एलटीटी १२११२ अमरावती - सीएसएमटी १२१०६ गोंदिया - सीएसएमटी १८०३० शालीमार - एलटीटी १२८१० हावडा - सीएसएमटी मेल (नागपूरमार्गे) १२५१२ शालीमार - एलटीटी समरसता एक्स्प्रेस १७०५८ सिकंदराबाद - सीएसएमटी