
कोची : पार पडला. पण या लिलावात एक सुंदर चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. आयपीएलच्या लिलावात पाहायला मिळालेल्या सुंदर ललना जी होती तिचे नाव आहे . पण हा काव्या मारन नेमकी आहे तरी कोण, याची माहिती अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाही. काव्या मारन हे नाव बऱ्याच जणांना माहिती आहे. पण तिची संपूर्ण माहिती मात्र बऱ्याच जणांना नाही. अनेकांना काव्याबद्दल ही माहिती नाही की ती हैदराबाद संघाचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. देशातील सर्वात मोठ्या टीव्ही नेटवर्कमध्ये सन टीव्ही नेटवर्क (ज्यांच्याकडे ३२ टीव्ही आणि ४२ एफएम रेडिओ स्टेशन आहेत) चा समावेश होतो. काव्या क्रिकेट सोबत एफएम रेडिओमध्ये देखील सक्रीय असते. गेल्या वर्षी काव्याला सन टीव्ही नेटवर्कच्या संचालक मंडळात घेण्यात आले होते. काव्याने चेन्नईमधील स्टेलिया मारिस कॉलेजमधून बी कॉमची पदवी घेतली. तिने सन टीव्ही नेटवर्कमधून इंटर्नशिप केली होती. त्यानंतर न्यूयॉर्कमधील लियोनार्ड अण्ड स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून MBA पूर्ण केले. काव्याने २०१७ नंतर सन टीव्ही ग्रुपच्या डिजिटल मार्केटला वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. काव्या सन नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्टची प्रमुख आहे. फार कमी वयात काव्याने ही मोठी मजल मारलेली आहे. आयपीएलच्या लिलावात यापूर्वी चर्चा व्हायची ती अंबानींची. पण गेल्या काही वर्षांपासून काव्याची जोरदार चर्चा असल्याचे पाहायला मिळते. आयपीएलच्या लिलावासाठीही काव्याने मोठी खेळी खेळल्याचे पाहायला मिळाले. कारण आयपीएलच्या लिलावासाठी सर्वाधिक पैसे हे काव्याच्या हैदराबाद संघाकडे होते. या लिलावासाठी हैदराबादने तब्बल ४२ कोटी रुपये आपल्या खात्यात ठेवले होते. हैदराबादच्या संघाने हॅरी ब्रुक्स या इंग्लंडच्या खेळाडूला तब्बल १३.२५ कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर हैदराबादने मयांक अगरवालला ८.२५ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आणि आपल्या ताफ्यात दाखल केले. पण दुसरीकडे त्यांनी आपला कर्णधार केन विल्यम्सनवर मात्र बोली लावली नाही.