आई बाबा बाहेर गेलेत, घरी ये! प्रेयसीचा घायाळ करणारा कॉल, तरुण पोहोचला अन् खरंच घायाळ झाला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 9, 2022

आई बाबा बाहेर गेलेत, घरी ये! प्रेयसीचा घायाळ करणारा कॉल, तरुण पोहोचला अन् खरंच घायाळ झाला

https://ift.tt/pUwASQ4
बांदा: उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये एक विचित्र घटना घडली. एका तरुणीच्या प्रियकराला तिच्या नातेवाईकांनी चोर समजून मारहाण केली. रक्तबंबाळ झालेल्या तरुणाला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार झाले. त्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी हायर सेंटरला पाठवण्यात आलं. बिसंडा येथील गावात हा प्रकार घडला. घायाळ डीजे वाजवण्याचं काम करतो. रात्री डीजे वाजवून घरी परतत असताना त्याला प्रेयसीचा मेसेज आला. तरुणाला घड्याळ गिफ्ट करणार होती. त्याचसाठी तिनं प्रियकराला फोन केला. मम्मी-पप्पा घरात नाहीत. तू लगेच घरी ये आणि तुझं घड्याळ घेऊन जा, असं तिनं सांगितलं. यानंतर त्यानं प्रेयसीचं घर गाठलं. दरवाजा उघडून आत जाऊ लागला. तरुणाला घरात शिरताना मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी पाहिलं. त्यांनी चोर समजून त्याला बेदम मारहाण केली. आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक जमले. शेजाऱ्यांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केलं. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तरुणाच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एक तरुण डीजे वाजवण्यासाठी गेला होता. परतत असताना तो एका तरुणीच्या घरी गेला. त्यामुळे त्याला मारहाण झाली. पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती बिसंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी आनंद कुमार यांनी दिली.