पैसा होता.. प्रसिद्धी होती..अचानक नको ते घडलं, सोशल मीडिया स्टारचं धक्कादायक पाऊल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 28, 2022

पैसा होता.. प्रसिद्धी होती..अचानक नको ते घडलं, सोशल मीडिया स्टारचं धक्कादायक पाऊल

https://ift.tt/hoYIUFi
रायपूर : छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील सोशल मीडिया स्टार लीला नागवंशीनं फाशी लावून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना रायगडमधील केलो बिहार कॉलनीत घडली आहे. घरातील छताला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. चक्रधर नगर पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सोशल मीडियावरील विव्यू कमी झाल्यानं चिंतेत होती असं सांगितलं जात आहे. तिच्या आत्मह्त्येचं हे देखील एक कारण सांगितलं जात आहे. आम्ही सर्व शक्यतांची पडताळणी करत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं आहे. सोशल मीडियाशी संबंधित सर्व गोष्टींची माहिती घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी लीला नागवंशीच्या कुंटुंबीयांची देखील चौकशी सुरु केली आहे. सोशल मीडिया स्टार लीला नागवंशीच्या आत्महत्येनंतर पोलीस पोहोचण्यापूर्वी तिचा मृतदेह खाली काढण्यात आलेला होता. त्यामुळं कुटुंबीय देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. लीला नागवंशी सोशल मीडियावर प्रसिद्ध होती. व्हिडिओज आणि फोटो पोस्ट करत होती. इन्स्टाग्रामवर तिचे १० हजार पेक्षा अधिक फॉलोअर्स होते. मात्र, ती काही व्यक्तिगत कारणांमुळं चिंतेत होती, असं सांगितलं जातं. ख्रिसमसल एक व्हिडिओ देखील तिनं अपलोड केला होता. रायगढचे सीएसपी अभिनव उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार लीला नागवंशीनं आत्महत्या १ वाजण्याच्या सुमारास केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं दाखल झाले. लीला नागवंशीनं ओढणीच्या सहाय्यानं जीवन संपवल्याची माहिती पोलिसांना घटनास्थळी दाखल झाल्यावर समजलं. लीला नागवंशीचं वय २२ वर्ष इतकं होतं. पोलिसांनी लीला नागवंशीचा फोन देखील जप्त केला आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तिच्या मृतदेहाजवळ किंवा खोलीत सुसाईड नोट देखील आढळलेली नाही. त्यामुळं पोलीस सर्व शक्यता समोर ठेऊन तपास करत आहेत.