
नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या दरात आजही तेजी दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होती, मात्र वर्षअखेरीस दरात वाढ होताना दिसत आहे. परिणामी नवीन वर्षात सर्वसामान्य जनतेसमोर पुन्हा एकदा इंधन दरवाढीचे संकट उभे राहिले आहेत. दरम्यान, आज म्हणजेच २७ डिसेंबर २०२२ रोजी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल ८३.९२ डॉलर तर WTI कच्चे तेलाची किंमत ८०.४२ डॉलर प्रति बॅरल इतकी आहे. ओपेक देशांनी घेतलेल्या निर्णयाच्या परिणामी क्रूडची विक्रमी पातळी घसरून एकावेळी १०० डॉलरच्या जवळपास पोहोचली होती. मात्र, देशांतर्गत बाजारात गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच आहेत. आज, सोमवारीही देशात इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे २७ डिसेंबर २०२२ रोजीही तेल कंपन्यांनी इंधनच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. एसएमएसद्वारे किंमत तपासून घ्या... पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी ६ वाजता अपडेट केले जातात. तुम्ही एसएमएसद्वारे इंधनाचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP स्पेस पेट्रोल पंप कोड ९२२४९९२२४० वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात तर BPCL चे ग्राहक RSP ९२२३११२२२२ वर एसएमएस पाठवून ताजे दर जाणून घेऊ शकतात. तसेच HPCL चे ग्राहक HPPprice ९२२२२०११२२ वर एसएमएस पाठवून गाडीची टाकी पूर्ण करण्यापूर्वी दर तपासू शकतात. कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर आज देशात पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे का, हे जाणून घ्यायचे असेल तर आधी आजचे इंधन दर जाणून घ्या. मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरातील इंधन दर खालीलप्रमाणे आहेत. मुंबई: पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर, डिझेल: ९४.२७ रुपये प्रति लीटर अहमदनगर: पेट्रोल ११०.१५ रुपये प्रति लिटर, डिझेल: ९२.९२ रुपये प्रति लिटर बृहन्मुंबई: पेट्रोल १०९.९८ रुपये प्रति लिटर, डिझेल: ९४.१४ रुपये प्रति लिटर कोल्हापूर: पेट्रोल ११०.०९ रुपये प्रति लिटर, डिझेल: ९२.८९ रुपये प्रति लिटर नागपूर: पेट्रोल १०९.७१ रुपये प्रति लिटर, डिझेल: ९२.५३ रुपये प्रति लिटर नाशिक: पेट्रोल १०९.४९ रुपये प्रति लिटर, डिझेल: ९२.२९ रुपये प्रति लिटर पुणे: पेट्रोल १०९.४५ रुपये प्रति लिटर, डिझेल: ९२.२५ रुपये प्रति लिटर रत्नागिरी: पेट्रोल ११०.९७ रुपये प्रति लिटर, डिझेल: ९३.६८ रुपये प्रति लिटर सिंधुदुर्ग: पेट्रोल १११.५२ रुपये प्रति लिटर, डिझेल: ९४.२६ रुपये प्रति लिटर यवतमाळ: पेट्रोल ११०.९३ रुपये प्रति लिटर, डिझेल: ९३.७० रुपये प्रति लिटर