पालघर : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केल्याची धक्कादायक घटना माहीम येथे घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाच आरोपी तरुणांना सातपाटी पोलिसांनी अटक केली असून अन्य सहा आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पालघर तालुक्यातील माहीम परिसरातील पाणेरीनजीक एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला काही तरुणांनी जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेले. त्यानंतर जबरदस्ती करत या अल्पवयीन मुलीवर ११ तरुणांनी सामूहिक अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस चौकी गाठत अत्याचार करणाऱ्या तरुणांना विरोधात तक्रार दाखल केली. क्लिक करा आणि वाचा- सातपाटी सागरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या माहीम चौकी दुरक्षेत्रात माहीम परिसर येत असून या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सहा आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपी हे पालघर तालुक्यातीलच माहीम, हनुमान पाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील रहिवासी असून बहुतांश तरुण हे नशेच्या आहारी गेल्याचे देखील कळते. याप्रकरणी अधिक तपास सातपाटी पोलीस करीत आहे. क्लिक करा आणि वाचा-