तुमच्या विभागाने मला फसवले आहे, फेक शिक्षणाधिकारी महिलेने घातला गोंधळ, केले गंभीर आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 29, 2022

तुमच्या विभागाने मला फसवले आहे, फेक शिक्षणाधिकारी महिलेने घातला गोंधळ, केले गंभीर आरोप

https://ift.tt/BjHuGw3
: वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जाकिरा फिरदोस गफ्फार शेख, शाहिद उल्लू खान या दोघांना फेक शिक्षणाधिकारी म्हणून शाळा तपासणी करत असताना पकडण्यात आल्यानंतर खळबळ उडाली होतीह. या प्रकरणी २२ डिसेंबर २०२२ रोजी वळसंग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा देखील झाला आहे. याच महिलेने गुरुवारी २८ डिसेंबर २०२२ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात येऊन मोठा गोंधळ केला. तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी मला शिक्षण खात्याचे ओळखपत्र बनवून दिले. शिक्षण खात्यात भरपूर नोकऱ्या आहेत, उमेदवार आणा असे सांगत पैसे घेण्यास सांगितले. जवळपास २० ते २२ लाख रुपये मी तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला दिले असे गंभीर आरोप यावेळी या महिलेने केले. प्रभारी शिक्षण अधिकारी संजय जावीर हे मिटिंग संपवून जाताना जाकिरा शेख या महिलेने अडविले. साहेब मला फसवले गेले, तुम्ही देखील त्यात सहभागी आहात, असे गंभीर आरोप केले. यावेळी प्रभारी शिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी मी तुम्हाला ओळखत नाही, असे स्पष्टपणे सांगत निघून गेले. क्लिक करा आणि वाचा- 'मला स्वतःला माहीतच नव्हते मी फेक शिक्षण अधिकारी आहे' जाकिरा गफ्फार शेख ही महिला गेल्या दोन वर्षांपासून सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळामध्ये जाऊन मी इंस्पेक्शन अधिकारी आहे, शाळा व पटसंख्या तपासणी करण्यासाठी आले, असे सांगत असे. ही बाब दोन वर्षांपासून सुरू होती. तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना अटक झाल्यानंतर, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. क्लिक करा आणि वाचा- जाकिरा शेख म्हणाल्या की, किरण लोहार ड्युटीवर असेपर्यत दररोज एक दोन शाळा तपासणी करून किरण लोहार यांकडे सादर करत होते. ज्यावेळी मला पोलिसांनी अटक केली , त्यावेळी मला माहिती झाले की, मला कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी नाही. शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी मला नोकरी लागल्याचे भासवून फसविले आहे. माझ्याकडे नांदेड जिल्ह्यातील शिक्षण खात्याचे ओळखपत्र सोलापूर शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी दिले आहे, असा गंभीर आरोप जाकिरा शेख या महिलेने केला आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार, माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्कर बाबर यांच्यावर गंभीर आरोप केले. क्लिक करा आणि वाचा- प्रभारी शिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी महिलेला ओळख देण्यास स्पष्टपणे नकार दिला किरण लोहार यांच्यावर निलंबन कारवाई झाल्यापासून प्रभारी शिक्षण अधिकारी म्हणून संजय जावीर कामकाज पाहत आहेत. किरण लोहार शिक्षणाधिकारी असताना संजय जावीर उपशिक्षणाधिकारी होते. किरण लोहार यांकडे मी अनेकदा आले , त्यावेळी तुम्ही देखील माझ्याशी बोलला आहात. मला आता ओळख का देत नाही? मी माझ्या परिसरातील अनेक लोकांकडून शिक्षण खात्यात नोकरी लावते असे सांगून, रक्कम घेतली आहे. ती रक्कम फसवून घेतली आहे. ती रक्कम परत द्या असे संताप व्यक्त करत सांगत असताना प्रभारी शिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी ओळख देण्यास स्पष्टपणे नकार देत काढता पाय घेतला. संबंधित महिला प्राथमिक शिक्षण विभागात ताटकळत बसून बसून उद्या येते असे सांगून गेली आहे. आता हे प्रकरण कुठं पर्यंत जाणार?, कोणकोणते अधिकारी यामध्ये अडकतील या पाहण्यासारखे आहे.