सरफराज सनदी, सांगली : आटपाडीच्या झरे येथे टँकरचा विचित्र अपघात झाला आहे. ज्यामध्ये टँकरने तीन वाहनांना जोरदार धडक दिली आहे. त्यानंतर भरधाव वेगात असलेल्या टॅंकरची मागील बाजूची चाके निखळून एक महिला ठार झाली, तर एक जखमी झाली आहे. या अपघातात दोन वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या बाबतीत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती, याप्रमाणे आटपाडी तालुक्यातील झरे येथील एका कृषी केंद्रासमोर रस्त्याच्या साईड पट्टीच्या बाजूला पारेकरवाडी येथील मंगेश धोंडीराम दगडे आपली दुचाकी उभी करून शेतीचे औषध आणण्यासाठी दुकानात गेले होते. त्या दुकाना शेजारी सुरेश पवार यांचे गुरुदत्त इलेक्ट्रिकलचे दुकान असून ते परगावी देवदर्शनाला जाण्यासाठी आपली दुचाकी गाडी स्वच्छ करत बसले होते. त्यांची पत्नी राणी सुरेश पवार रस्त्यालगत येऊन थांबल्या होत्या. त्यांच्या शेजारी असणाऱ्या वाघजाई बोरवेलचे दुकान आहे. प्रकाश जयवंत पवार व संगीता प्रकाश पवार (वय वर्ष 45) हे दोघे पती-पत्नी ( रा. तरसवाडी ता. खटाव ) रस्त्यालगत टीव्हीएस लुनावरती बसण्यासाठी बाहेर आले होते. याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या टँकरने पहिल्यांदा मंगेश धोंडीराम दगडे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली, ज्या मध्ये राणी पवार या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर वाघजाई बोरवेलच्या समोर टीव्हीएस लुना (एम एच 11 -ca 38 5९) या गाडीलाही टँकरने उडवले. यावेळी टँकरचे मागील डाव्या बाजूला असलेली चाके निखळली आणि त्या चाकाची संगीता पवार यांच्या डोक्याला जोरदार धडक बसली, यामुळे त्यांचा मृत्यू झाला. टँकर चालकांनी वेगाने आपली गाडी पळवण्याचा प्रयत्न केला मात्र गावातला तरुणांनी टँकरचा पाठलाग करून टँकर चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिला आहे याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये टँकर चालक सुरेश सूर्यवंशी ( रा. भूयाचीवाडी ता.कराड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://ift.tt/uo0dFiE