जेसीबीद्वारे गुलाल, डीजे, चिथावणीखोर भाषण... परवानगी घेतलीच नाही; ६ जणांवर गुन्हा दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 25, 2022

जेसीबीद्वारे गुलाल, डीजे, चिथावणीखोर भाषण... परवानगी घेतलीच नाही; ६ जणांवर गुन्हा दाखल

https://ift.tt/TwceLif
: ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी पॅनलच्या बाजूने काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण केल्याप्रकरणी पॅनल प्रमुखांसह माजी सरपंचांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे, निलेश हरिभाऊ केदारी, अक्षय यशवंत तावरे, सुरज प्रल्हाद तावरे, समीर कैलास जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. गुन्हा नोंद करण्यात आलेले हे सर्व कार्यकर्ते बारामती तालुक्यातील मोरगावचे रहिवासी आहेत. याबाबत पोलीस हवालदार तुषार शिवाजी जैनक यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. क्लिक करा आणि वाचा- ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंगळवार दिनाक २० डिसेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान बारामती तालुक्यातील मोरगाव हद्दीत विजयी मिरवणूक काढण्यात आली. पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे, निलेश हरिभाऊ केदारी, अक्षय यशवंत तावरे, सुरज प्रल्हाद तावरे, समीर कैलास जाधव यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयी उमेदवाराची ही विजयी मिरवणूक काढली. विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांनी ही विजयी मिरवणूक काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती. क्लिक करा आणि वाचा- विनापरवाना काढण्यात आलेल्या या विजयी रॅलीदरम्यान या सर्वांनी जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण केली. तसेच या मिरवणुकीत विनापरवाना डीजेचा देखील वापर करण्यात आला. इतक्यावरच न थांबता मयुरेश्वर मंदिरासमोर विनापरवाना भाषण करून सभ्यता व नीतीमत्ता यांस धोका पोहचेल असे चिथावणीखोर भाषण केले, असाही त्यांच्यावर आरोप आहे. तसेच पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केला अशा आशयाच्या फिर्यादीवरून या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा-