हॉटेलमधून हाकलल्याने तुमचा अवमान, मला माफ करा; रितेश देशमुखने मागितली क्षमा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 25, 2022

हॉटेलमधून हाकलल्याने तुमचा अवमान, मला माफ करा; रितेश देशमुखने मागितली क्षमा

https://ift.tt/i5K31Jn
कोल्हापूर : प्रख्यात अभिनेता यांच्या मीडिया ऑर्गनायझरकडून कोल्हापूरात पत्रकारांना हीन दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी रितेशने क्षमा मागितली आहे. तुमचा अवमान झाला, त्याबद्दल मला माफ करा, असं रितेश म्हणाला. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनानंतर रितेश बोलत असताना काही स्थानिक पत्रकारांनी त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली. यावेळी त्याच्यासोबत पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया देशमुखही होती. पत्रकार काय म्हणाले? रितेश देशमुख कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला आणि वेड चित्रपटाच्या प्रमोशनला आला होता. दुपारी पत्रकार परिषदेच्या वेळी रितेशने पत्रकार संघटनेचा अवमान केला, अशी तक्रार एका पत्रकाराने केली. रितेश देशमुख काय म्हणाला? तुम्हाला जर असं वाटत असेल, की माझ्याकडून काही अवमान वगैरे झाला, तर मी तुमची माफी मागतो. आम्ही कोणाशी भेटणार हे, आम्ही ऑर्गनाईज केलं नव्हतं, असं रितेश म्हणाला. आम्हाला निमंत्रण नव्हतं हे मान्य, पण आम्हाला कल्पना नव्हती की निवडक लोक आहेत की सगळ्यांना बोलू दिलं जाणार, पण आमच्या पाठी बाऊन्सर लावून हॉटेलमधून अक्षरशः हाकललं, अशी नाराजी एका पत्रकाराने व्यक्त केली. तुमच्यासोबत काय घडलं मला माहिती नाही, मी इथे आलो, पण कोणाला भेटायचं आहे, हेही मला ठावूक नव्हतं, ते माझ्या हातात नव्हतं, तुमचा अवमान झाला, त्यासाठी मी माफी मागतो. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या, असं रितेशने सांगितलं. माझ्या लग्नाला अकरा वर्ष झाली, पण कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला आम्हाला कधीच एकत्र येता आलं नव्हतं. काही लोकांशी समक्ष भेट झाली नाही, त्याबद्दल मी माफी मागतो, आणि कोणाचा अवमान झाला असेल, तर त्यांचीही मी माफी मागतो, तुम्हा सर्वांवर महालक्ष्मीचा आशीर्वाद असावा, अशी मनोकामना त्याने व्यक्त केली. हेही वाचा : रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया यांची मुख्य भूमिका असलेला वेड हा मराठी चित्रपट ३० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. दोघांची एकत्र प्रमुख व्यक्तिरेखा असलेला हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. त्यामुळे रितेश-जिनिलियाच्या चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे. हेही वाचा :