धक्कादायक! कपडे खरेदीसाठी गेलेल्या युवकाला मॉलमध्ये बेदम मारहाण; एक दिवस कोंडूनही ठेवले, 'हे' कारण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 31, 2022

धक्कादायक! कपडे खरेदीसाठी गेलेल्या युवकाला मॉलमध्ये बेदम मारहाण; एक दिवस कोंडूनही ठेवले, 'हे' कारण

https://ift.tt/biB2vgd
: एका मॉलमध्ये चोरीच्या संशयावरून युवकाला मालकासह सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक शहरात नव्याने सुरू झालेल्या मॉलमध्ये ही घटना घडली आहे. चोरीच्या संशयावरून युवकाला मारहाण करण्यात आली आहे. त्यात तो गंभीरपणे जखमी झाल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर त्याला एक दिवस मॉलमध्ये कोंडून देखील ठेवण्यात आले असल्याचं त्याने जबाबात म्हटले आहे. दरम्यान सुटका झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित संचालकांसह सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की, मॉलमध्ये फिर्यादी युवक कपडे खरेदीसाठी गेला होता. मात्र त्यावेळी त्याच्यावर शर्ट चोरी केल्याचा आळ घेत अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. क्लिक करा आणि वाचा- संशयित मारहाण करून थांबले नाही तर त्यानंतर त्याला एक दिवस तिथेच डांबून ठेवण्यात आले. मात्र कशीबशी सुटका झाल्यानंतर तो घरी पोहोचला आणि घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. अशी माहिती जखमी युवकाने पोलिसांना दिली आहे. तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर गंगापूर पोलिसांना या सर्व प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. तेव्हा गंगापूर पोलिसांनी तात्काळ धाव घेत रुग्णालय गाठले होते. क्लिक करा आणि वाचा- पोलिस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर युवकाचा जबाब नोंदविण्यासाठी त्याच्याकडे गेले मात्र त्यावेळी युवक बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याचा जबाब नोंदविण्यात आला. तरुणाच्या तक्रारीवरून मॉलचे संशयीत चालक आणि सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंडविदायक कलम ३२४, ३४२ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र म्हैसाणे हे करत आहेत. क्लिक करा आणि वाचा- नाशिक शहरात नव्याने सुरू झालेल्या मॉलमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. केवळ चोरीच्या संशयावरून युवकाला मारहाण करण्यात आली असल्याचे त्याचे म्हणणे आहे. युवक गंभीरपणे जखमी झाला आहे. दरम्यान आता हे प्रकरण नेमकं काय ? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.