अर्जुनच्या शतकावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया आली; मॅचच्या आधी दिला होता हा एकच सल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 16, 2022

अर्जुनच्या शतकावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया आली; मॅचच्या आधी दिला होता हा एकच सल्ला

https://ift.tt/9SFoOL0
मुंबई: (Arjun Tendulkar)ने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणात बुधवारी शतक झळकावले. गोवा संघाकडून खेळताना २३ वर्षीय अर्जुनने राजस्थानविरुद्ध १२० धावा केल्या. अर्जुनचे वडील आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर( )ने १९८८ साली रणजीत पदार्पण केले होते. सचिनने देखील पहिल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. मुंबई संघाकडून संधी न मिळाल्याने अर्जुनने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक आणि सर्वाधिक धावांचा विक्रम करणाऱ्या सचिनसाठी हा मोठा आनंदाचा क्षण ठरला असे म्हणावे लागले. रणजी पदार्पणात शतक केल्यानंतर सचिनने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान फलंदाज असलेल्या सचिनने एका कार्यक्रमात अर्जुनच्या शतकावर प्रतिक्रिया दिली. चांगले झाले तुम्हा हा प्रश्न विचारलात. मला आठवते की, मी माझ्या वडिलांना कोणी तरी सांगता ऐकले होते की, त्यांना कोणी तरी सचिनचे वडील म्हणून हाक मारली होती. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी भारताकडून खेळण्यास सुरुवात केली होती. वाचा- त्यांनी (वडिलांनी) ही गोष्टी ऐकली आणि माझ्या वडिलांच्या मित्रांनी त्यांना विचारले की तुम्हाला आता कसे वाटते? त्यावर वडील म्हणाले, हा माझ्या आयुष्यातील सर्वात गौरवपूर्ण क्षण आहे. प्रत्येक वडिलांची इच्छा असते की मुलांच्या कामगिरीवर त्यांची ओळख व्हावी. अर्जुनवर दबाव सचिन तेंडुलकरने ही गोष्ट देखील मान्य केली की माझा मुलगा असल्याने अर्जुनवर अतिरिक्त दबाव असतो. जेव्हा सचिन क्रिकेट खेळत होता तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. त्याच बरोबर मॅचच्या एक दिवस आधी अर्जुन सोबत सचिनचे बोलण आले. तेव्हा अर्जुन नाबाद खेळत होता. वाचा- ... मी त्याला शतक पूर्ण करण्यास सांगितले. तो ४ धावांवर नाबाद खेळत होता. त्याला नाइटवॉचमन म्हणून पाठवले होते. तुम्हाला काय वाटते चांगली धावसंख्या किती असेल? तेव्हा गोव्याने ५ बाद २१० धावा केल्या होत्या. सचिनने किमान ३७५ पर्यंत धावा कराव्या लागतील असे उत्तर दिले. त्यावर सचिनने अर्जुनला हे देखील सांगितले की, विश्वास ठेव तु शतक करू शकतोस.