
परभणी: सकाळी सकाळी दारू पिऊन घरी आलेल्या पतीने पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने फवारणीसाठी आणलेले विषारी औषध पत्नीला पाजल्याची घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पोखर्णी वाळके येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी करे असे गुन्हा दाखल झालेले आरोपी पतीचे नाव आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पोखर्णी वाळके प्रांजली करे या घरी असताना त्यांचे पती बालाजी करे हे सकाळी दारू पिऊन घरी आले. बालाजी करे यांनी पत्नी प्रांजल करे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावर पत्नीने पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर बालाजी करे यांनी पत्नीला मारहाण केली आणि कापूस फवारणीसाठी आणलेले विषारी औषध पत्नीला पाजले. त्यामुळे प्रांजल करे या बेशुद्ध झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. वाचाः उपचार घेऊन बरे झाल्यानंतर प्रांजल करे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती बालाजी करे यांच्या विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान पतीने पत्नीला दारूसाठी पैसे न दिल्याने विषारी औषध पाजल्याने गावामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील काही दिवसापासून परभणी मध्ये महिलांना मारहाण करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाचाः