इंस्टाग्रामवर मैत्री करत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले, पुढे जे घडले त्याने कुटुंबीयांना बसला धक्का - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 16, 2023

इंस्टाग्रामवर मैत्री करत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले, पुढे जे घडले त्याने कुटुंबीयांना बसला धक्का

https://ift.tt/AgShLUE
: इंस्टाग्रामवर मैत्री करून आपल्या जाळ्यात ओढत एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याची घटना कल्याणमध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे. कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. ठाणे पश्चिम येथील अशोक नगरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय बाळू गायकवाड (२२) असे या आरोपीचे नाव असून त्याने कोळसेवाडी हद्दीतील एका पंधरा वर्षे नऊ महिन्याच्या अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामद्वारे मैत् केली. त्यानंतर तिच्याशी जवळीक साधत तिला त्याने आपल्या जाळ्यात ओढले. पुढे डिसेंबर २०२१ पासून आरोपी अक्षय गायकवाडने तिच्यावर अनेक वेळा शारीरिक अत्याचार केले. त्यात ती सहा महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर आल्याने तिच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला.क्लिक करा आणि वाचा- आपली बहीण सहा महिन्यांची गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या बहिणीने पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून त्वरित गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी अक्षय गायकवाड या नराधमाला ताब्यात घेत त्याला अटक केली. क्लिक करा आणि वाचा- पालकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचेया उदाहरणानंतर सोशल मीडियामार्फत मैत्री करत असताना अल्पवयीन मुलींनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे या प्रकरणावरून अधोरेखित झाले आहे. तसेच पालकवर्गाने देखील असे प्रकार होऊ नयेत यासाठी सावधगिरी बाळगणे ही काळाजी गरज असल्याची चर्चा कल्याणमध्ये ऐकायला मिळत आहे.क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, या गुन्ह्याचा अधिक तपास कोळसेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी महिला पोलीस उपनिरीक्षक एन के भोईगड करत आहेत. ही माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांनी दिली आहे.