
नवी दिल्ली: आजपासून नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारी २०२३ बँकांच्या सुट्ट्यांच्या बाबतीतही खास असणार आहे. सर्व बँक ग्राहकांना जानेवारी २०२३ च्या बँक सुट्ट्यांच्या तारखांची जाणीव असणे महत्वाचे आहे, जेणेकरून ते त्यांचे बँकेचे काम त्यानुसार शेड्यूल करू शकतील. बँकेच्या सुट्ट्या प्रत्येक राज्यासाठी वेग-वेगळ्या असतात. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जानेवारी २०२३ मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. अशा परिस्थितीत, जानेवारीसाठी कामांसाठी शाखेत जाण्यापूर्वी तुम्ही बँकेच्या सुट्टीची यादी तपासली पाहिजे. या यादीनुसार जानेवारी २०२३ मध्ये एकूण १३ दिवस बँका बंद राहतील. विशेष म्हणजे नवीन वर्षाची सुरुवातही साप्ताहिक सुट्टीने झाली असून यामध्ये दुसऱ्या व चौथ्या शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. बँक हॉलिडे लिस्ट आरबीआयच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आली आहे. ऑनलाइन कामांची सुविधा रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नवीन वर्ष २०२३ साठी बँकिंग सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या बँक सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणारे सण आणि कार्यक्रमांनुसार असतील. मात्र, बँकांचे कामकाज बंद असताना ग्राहक इंटरनेट बँकिंगचा वापर करून काम किंवा व्यवहार घरी बसून सहज करू शकतात. बँकांच्या ऑनलाइन सेवा २४ तास, आठवड्याचे सातही दिवस सुरु असतात. देशभरात एकूण १३ दिवस बँकांचे कामकाज बंद असेल तर महाराष्ट्रात स्थिती कशी असेल तर खालीलप्रमाणे जाणून घेऊया. जानेवारी २०२३ मध्ये या सुट्ट्या १ जानेवारी (रविवार), देशभरात साप्ताहिक सुट्टी. ८ जानेवारी (रविवार), देशभरात साप्ताहिक सुट्टी १४ जानेवारी (दुसरा शनिवार), देशभरात साप्ताहिक सुट्टी १५ जानेवारी (पोंगल/रविवार), देशभरात साप्ताहिक सुट्टी २२ जानेवारी (रविवार), देशभरात साप्ताहिक सुट्टी २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय सुट्टी २८ जानेवारी (दुसरा शनिवार), देशभरात साप्ताहिक सुट्टी २९ जानेवारी (रविवार), देशभरात साप्ताहिक सुट्टी वरील यादीनुसार या वर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिननिमित्त (गुरुवारी) एकमेव राष्ट्रीय सुट्टी असून यादिवशी देशातील सर्वच बँका बंद राहतील. मात्र, देशातील काही राज्य भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, जम्मू, कोची, कोलकाता आणि श्रीनगर यासारखी काही निवडक शहरात २६ जानेवारी रोजी बँकांना सुट्टी नसते. भारतकय मध्यवर्ती बँक, आरबीआय, त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रकाशित करते. मध्यवर्ती बँक राज्यानुसार संपूर्ण वर्षासाठी बँक सुट्ट्या जाहीर करते.