
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा ३० डिसेंबरला पहाटे अपघात झाला. २५ वर्षीय पंतची मर्सिडीज कार दिल्ली-डेहराडून हायवेवर रोडवरून जात असताना डिव्हायडरला धडकली. या अपघातात ऋषभ पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला खूप दुखापत झाली होती. पंतची आई सरोज पंत आणि लंडनची बहीण साक्षी त्याच्यासोबत मॅक्स हॉस्पिटलमध्ये आहेत. आता ऋषभ पंतच्या आरोग्याचे ताजे अपडेट समोर आले आहेत. रोहित डॉक्टरांशी बोलला ताज्या अपडेटनुसार ऋषभ पंतच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होत असून त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा कोणताही निर्णय डॉक्टरांनी घेतलेला नाही. पण सध्या तो आयसीयूमध्ये आहे. पंतच्या काही मित्रांनी त्याला तिथे रुग्णालयात भेट दिल्यानंतर ही माहिती दिली. त्याचवेळी, इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही सध्या ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. रोहित सध्या नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मालदीवमध्ये गेला आहे. वाचा: पंतची पहिली ड्रेसिंग कुटुंबासोबत सतत रुग्णालयात असलेल्या उमेश कुमार यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, 'सध्या ऋषभला इतर कोणत्याही रुग्णालयात हलवण्याचा कोणताही विचार नाही. कालपासून त्याच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. शुक्रवारीच त्याच्या कपाळाची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. पहिली ड्रेसिंग शनिवारी केली गेली. बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहेत आणि त्याला इतर कोणत्या रुग्णालयात हलवायचे की नाही याचा निर्णय घेतील. हेही वाचा: बीसीसीआय पंतच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून शनिवारी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा, बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनीही पंतची मॅक्स हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. त्याचवेळी ऋषभ पंतची भेट घेतल्यानंतर श्याम शर्मा पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'येथील डॉक्टर पंतची चांगली काळजी घेत आहेत. बीसीसीआयही डॉक्टरांच्या संपर्कात असून त्याच्या प्रकृतीची वेळोवेळी माहिती घेत आहेत. सध्या तरी पंतला याच रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. ऋषभ पंतला दुखत असतानाही त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे. बीसीसीआय सर्व डॉक्टरांच्या संपर्कात आहे.' वाचा: एका प्रश्नाच्या उत्तरात श्याम शर्मा म्हणाले की, पंतने त्यांना सांगितले की, तो खड्डा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला आणि त्यावेळेस अंधारही होता. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर अनिल कपूर म्हणाले, 'पंतची प्रकृती ठीक आहे. आम्ही त्याला त्याचे चाहते म्हणून भेटलो. तो लवकर बरा व्हावा आणि आपण त्याला पुन्हा खेळताना पाहू अशी प्रार्थना करूया. अनुपम खेर म्हणाले की, 'आम्ही दोघांनी पंतला खूप हसवले. खेर म्हणाले, 'सगळं ठीक आहे. आम्ही पंत, त्याची आई आणि नातेवाईकांना भेटलो. ते सर्व ठीक आहेत.'