मुंबईकरांची 'यूटीएस' अ‍ॅपला पसंती; डिजिटल तिकिटाचा प्रवासी आकडा १.३५ कोटींपर्यंत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 30, 2023

मुंबईकरांची 'यूटीएस' अ‍ॅपला पसंती; डिजिटल तिकिटाचा प्रवासी आकडा १.३५ कोटींपर्यंत

https://ift.tt/oBu9VYf
मुंबई : रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांच्या रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्यासाठी रेल्वे प्रवाशांकडून डिजिटल तिकिटाला पसंती मिळत आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई विभागात जानेवारी २०२२मध्ये यूटीएस अ‍ॅपवरून तिकिटे बुक करण्याऱ्या प्रवाशांची संख्या ३७.१४ लाख होती. यात वाढ झाली असून, डिसेंबर २०२२अखेर हा प्रवासी आकडा १.३५ कोटींपर्यंत पोहोचला आहे.तिकिटांसह सर्व प्रकारचे पास नूतनीकरण, नवा पास काढणे अशा खरेदीतही मोठी वाढ झाली आहे. पेपरलेस तिकिटांकडे प्रवाशांचा ओढा असल्याने कागदांची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे, असा दावा रेल्वेकडून केला जात आहे. यूटीएस अ‍ॅपमध्ये प्रवाशांच्या मागणीनुसार बदल करण्यात आल्याने त्याचा वापर वाढत आहे. प्रथम श्रेणी आणि एसीची एकाच वेळी कमाल तिकिटे उपलब्ध होणे, पासची वैधता त्याच दिवसांपासून येणे, निर्बंधित श्रेत्राची मर्यादा वाढवणे, यामुळे यूटीएसला प्रवाशांची पसंती मिळत आहे.