
कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी येथे एका एअर होस्टेसनं केली आहे. इमारतीवरून उडी घेत तिनं जीवन संपवलं. बराच कालावधीपासून तिच्याकडे नोकरी नव्हती. काम मिळत नसल्यानं ती तणावाखाली होती. कोलकात्यातील प्रगती मैदान परिसरात असलेल्या मेट्रोपॉलिटन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत ती वास्तव्यास होती.देबोप्रिया बिस्वास (२७ वर्षे) पेशानं होती. शनिवारी संध्याकाळी चार वाजता तिनं तिच्या बहिणीच्या घरातून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. देबोप्रियाची बहिण चौथ्या मजल्यावर राहते. देबोप्रियानं चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. ती समोरच्या रस्त्यावर पडली आणि गंभीर जखमी झाली. तिला तातडीनं एसएसकेएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. देबोप्रियावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र काही वेळातच तिचा मृत्यू झाला. याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. देबोप्रियाकडे गेल्या दोन वर्षांपासून नियमित काम नव्हतं. त्यामुळे बराच कालावधीपासून ती तणावाखाली होती, अशी माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर दिली. या प्रकरणी प्रगती मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.