श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवरायांच्या फोटोसह लावला फलक; नगरमध्ये वातावरण तापले, शिवसेना आक्रमक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 22, 2023

श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवरायांच्या फोटोसह लावला फलक; नगरमध्ये वातावरण तापले, शिवसेना आक्रमक

https://ift.tt/vW7FKYM
: यांच्यासंबधी अपशब्द वापरल्या प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या श्रीपाद छिंदम याने शिवरायांच्या फोटोसह लावल्या फालकावरून नगरमध्ये वातावरण तापले आहे. उद्या रविवारी नगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनानंतर्फे हिंदू जागृती सभा आयोजित केली आहे. या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करणारा फलक छिंदम याने दिल्ली गेट येथे लावला आहे. त्याला युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम राठोड यांनी हरकत घेतली आहे. हा फलक काढून टाकावा अन्यथा शिवसेना या सभेत येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.भारताला हिंदू राष्ट्र घोषीत करण्याच्या मागणीसाठी रविवारी (२२ जानेवारी) नगरमध्ये जाहीर सभा होणार आहे. हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकाराने होणार्‍या या सभेचे नियोजन विश्‍वहिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज अशा विविध संस्थांसह राजकीय पक्षांनीही केले आहे. सुदर्शन चॅनेलचे प्रमुख संपादक सुरेश चव्हाणके यांचे मुख्य मार्गदर्शन या सभेत होणार आहे.क्लिक करा आणि वाचा- यासंबधी छिंदम यानेही लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करणारा फलक लावला आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि स्वतः चा फोटो लावला आहे. याला राठोड यांनी हरकत घेतली आहे. पूर्वी धिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदम याला हा अधिकार नाही, छिंदम म्हणजे सर्व पदमशाली समाज नाही आणि पदमशा ली समाज म्हणजे छिंदम नाही. त्यामुळे हा फलक काढून घयावा अन्यथा अशा प्रवृत्ती सहभागी असलेल्या सभेला शिवसेना येणार नाही, असा इशारा राठोड यांनी दिला आहे.क्लिक करा आणि वाचा- छिंदमने शिवरायांबद्दल वापरले होते अपशब्दकाही वर्षांपूर्वी छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यावेळी राज्यभर याचे पडसाद उमटले होते. त्यावर त्याचे उपमाहापौर पद गेले होते व भाजपमधून त्याची हाकालपट्टी करण्यात आली होती. नन्तर तो अपक्ष म्हणून पुन्हा निवडून आला होता. माघील महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये एकनाथ शिंदे नगर विजस मंत्री असताना त्याचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. शिवप्रेमींमध्ये त्याच्या विरुद्ध अद्याप राग आहे. अशा परिस्थितीत त्याने लावल्या फलकवरून आता वातावरण तापले आहे.क्लिक करा आणि वाचा-