Good News : शास्त्रज्ञांना मोठं यश, नवीन रक्तगटाचा शोध लावला; वाचा तुमच्यावर काय होणार परिणाम... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 21, 2023

Good News : शास्त्रज्ञांना मोठं यश, नवीन रक्तगटाचा शोध लावला; वाचा तुमच्यावर काय होणार परिणाम...

https://ift.tt/OJcKtm6
नवी दिल्ली : अनेकांना फक्त चारच रक्तगट असल्याचं माहिती आहे. पण असे डझनभर रक्तगट देखील अस्तित्वात आहेत. अशात शास्त्रज्ञांनी अलिकडेच आणखी एका नवीन रक्तगटाचा शोध लावला आहे. त्यांनी त्याचं नाव ER असं ठेवलं आहे. हा ४४ वा ज्ञात रक्तगट आहे. शास्त्रज्ञांसाठी हे मोठे यश मानलं जातं. इतकंच नाही तर या शोधामुळे रक्ताचे अनेक विकार शोधून त्याच्यावर उपचार करण्यासही मदत होणारे आहे. त्यामुळे रक्ताशी संबंधित काही आजार असतील तर त्यावरही उपचार करण्यामध्ये मोठी मदत होईल.नवजात बालकं आणि गर्भात होणाऱ्या आजारांवर देखील हा शोध महत्त्वाचा असणआर आहे. अधिक माहितीनुसार १९९२ मध्ये शास्त्रज्ञांना या रक्तगटाची पहिली माहिती मिळाली. तंत्रज्ञानाच्या मर्यादांमुळे त्याला या दिशेने फारशी प्रगती करता आली नाही. चार दशकांच्या अभ्यासानंतर याचा शोध लागला. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बायोकेमिस्टरीचे वरिष्ठ संशोधक टिम सॅचवेल यांनी या अभ्यास महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.नवीन तंत्रज्ञानाला अधिक पारंपरिक पद्धतीची जोड कशी देता येईल, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले. या माध्यमातून अनेक दिवसांपासून राहिलेलं कोडं सुटलं असून आणि प्रश्नांची उत्तर मिळाली. दरम्यान, रक्ताच्या प्रकारांची अनुवंशिक रचना समजून घेणे हे देखील महत्त्वाचे आहे. दुर्मिळ रक्तगट असलेल्या लोकांसाठी हा शोध अतिशय महत्त्वाचा असून यामुळे डॉक्टरांनाही रुग्णांची काळजी घेणं आणखी सोपं होणार आहे. त्यामुळे भविष्यात तुम्हालाही जर कुठला आजार सतवत असेल तर एकदा तुमचा रक्तगट नक्की तपासून पहा.