राजमाता जिजाऊंचे जगातील सर्वात मोठे रेखाचित्र, जामखेडमध्ये १५ हजार चौरस फुटांवर कलाकृती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 12, 2023

राजमाता जिजाऊंचे जगातील सर्वात मोठे रेखाचित्र, जामखेडमध्ये १५ हजार चौरस फुटांवर कलाकृती

https://ift.tt/8z3ye7V
अहमदनगर : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात भव्य रेखाचित्र तयार करण्यात आलंय. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून नागेश विद्यालयाच्या मैदानावर १५ हजार स्क्वेअर फूटवर राजमाता जिजाऊ यांचे जगातील सर्वात मोठे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. चित्रकार उद्देश पघळ यांनी हे चित्र साकारले असून श्री. नागेश विद्यालयाचे कलाशिक्षक मयूर भोसले आणि एनसीसी कॅडेट यांनी हे चित्र तयार करण्यासाठी विशेष सहकार्य केलंय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवघ्या 4 दिवसात हे रेखाचित्र पूर्ण झाले आहे.१२ जानेवारी रोजी जिजाऊ माँ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. त्यांना अनोखी आदरांजली देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. ज्याची नोंद जागतिक पातळीवरील विक्रमांमध्येही केली जात आहे. माँ साहेबांचे चित्र साकारण्यासाठी किल्ले बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेसॉल्ट खडकाच्या दगडाचा वापर करण्यात आला असून पांढरा व काळ्या चुन्याचा रंगवण्यासाठी वापर केलेला आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अनोखी आदरांजली देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलाय. ज्याची नोंद जागतिक पातळीवरील विक्रमांमध्ये देखील केली जात आहे. हे चित्र साकारण्यासाठी किल्ले बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेसॉल्ट खडकाच्या दगडाचा वापर करण्यात आलाय.पांढरा आणि काळ्या चुन्याचा रंगवण्यासाठी वापर देखील करण्यात आलाय. २१ ब्रास मोठी खडी, ३० गोण्या पांढरा चुना आणि २२ गोण्या काळा चुना वापरण्यात आला आहे. आज या रेखाचित्राचे उद्घाटन पार पडणार असून त्यानंतर ते सर्वसामान्यांना बघण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अशाच पद्धतीने रेखाचित्र काढले जाणार आहे.हेही वाचा :