धावती रेल्वे पकडण्याच्या नादात प्लॅटफॉर्ममध्ये अडकला, अनर्थ घडणार तेवढ्यात तो धावला, आरपीएफ जवानाला सलाम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 29, 2023

धावती रेल्वे पकडण्याच्या नादात प्लॅटफॉर्ममध्ये अडकला, अनर्थ घडणार तेवढ्यात तो धावला, आरपीएफ जवानाला सलाम

https://ift.tt/HkZ9jMw
जालना: जालना रेल्वे स्थानकावर काल एक धक्कादायक घटना घडली. पुणे-नांदेड एक्सप्रेस रेल्वे ही जालना स्थानकावरुन नांदेडसाठी सुटल्यानंतर चालत्या रेल्वेत बसण्याचा प्रयत्न करणार्‍या एका प्रवाशाचा तोल गेला. त्यामुळे तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला. प्रवासी जीवाची बाजी लावून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वरती येता येत नसल्याने पाहणाऱ्यांच्या देखील छातीत धडकी भरली होती.पण, चालत्या रेल्वेखाली प्रवासी अडकला असल्याचे दिसताच प्लॅटफॉर्मवर हजर असलेल्या आरपीएफचे जवान आसाराम झुंजरे यांनी जिवाची पर्वा न करता प्रवाशाकडे धाव घेत त्याला अक्षरशः ओढुन काढले. तोपर्यंत हे सर्व याची देही याची डोळा पाहणाऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या नागरिकांना दिसताच दोघा चौघांनी तिकडे धाव घेत त्या प्रवाशाला ओढण्यास मदत केली आणि त्याचे प्राण वाचवले.पुणे-नांदेड एक्सप्रेस रेल्वे ही २७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७.४६ वाजता जालना स्थानकावर आली. तिचा ५ मिनिटांचा थांबा झाल्यानंतर ती नांदेडसाठी रवाना होत होती. त्याच वेळी एक प्रवाशी धावत धावत आला आणि चालत्या रेल्वेत बसण्याचा प्रयत्न करु लागला. त्याने दरवाजाला धरुन रेल्वेच्या पायरीवर पाय दिला. परंतु, गाडीचा वेग वाढला होता.त्याच वेळी त्याचा पायरीवरचा पाय सटकला. त्यामुळे प्रवासी रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला. सदरील प्रवाशी हा रेल्वेखाली जात असल्याचे पाहून स्टेशनवरील आरपीएफचे जवान आसाराम झुंजरे आणि एका प्रवाशाने रेल्वेखाली जाणार्‍या प्रवाशाकडे धाव घेतली आणि रेल्वेखाली जाणार्‍या प्रवाशाला ओढून बाहेर काढले. या घटनेचा थरार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून चांगलाच व्हायरल होत आहे.